इचलकरंजी व आजूबाजूच्या गावातील लोकांच्या आरोग्यसेवेचा(Hospital) प्रमुख आधार असलेले इंदिरा गांधी रुग्णालय सध्या एका गंभीर संकटात सापडले आहे. गेल्या काही दिवसांत, रुग्णालयाच्या व्यवस्थापनातील अडचणी व कर्मचारी वर्गाच्या असंवेदनशीलतेमुळे रुग्णांना अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उपचार घ्यावे लागत आहेत.
माणुसकी फौंडेशनने या परिस्थितीचा आढावा घेतला असता असे आढळून आले की, रुग्णालयात(Hospital) उपचारासाठी आलेल्या निराधार रुग्णांना सहानुभूतीपूर्वक व दर्जेदार उपचार मिळत नाहीत. रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपण्यास सांगितले जाते, जे अत्यंत अपमानास्पद आहे. औषधे उपलब्ध असूनही बाहेरून औषध आणण्यास सांगणे, ICU बेड्स उपलब्ध नसणे, आणि तेथील स्टाफची अरेरावीची भाषा वापरणे असे अनेक प्रकार रुग्णालयात घडत आहेत. तज्ञ डॉक्टरांच्या अभावी रुग्णांना पुढील उपचारांसाठी सांगली आणि कोल्हापूर येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्याचे प्रकारही वाढले आहेत.
या गंभीर परिस्थितीवर माणुसकी फौंडेशनने ठाम पवित्रा घेतला असून, संबंधित कर्मचाऱ्यांना मौखिक जाब विचारला आहे. माणुसकी फौंडेशनने स्पष्ट केले आहे की इंदिरा गांधी रुग्णालय हे लोकांच्या सेवेसाठी आहे, आणि जे कर्मचारी आपली जबाबदारी नीटपणे पार पाडत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी.
फौंडेशनने मागणी केली आहे की, जे पद रिक्त आहेत, त्या पदांची लवकरात लवकर भरती करून रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून द्यावी. तसेच, रुग्णालयातील सेवेत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत. माणुसकी फौंडेशनचा हा लढा इंदिरा गांधी रुग्णालयाच्या गुणवत्ता व सेवेत सुधारणा घडवून आणण्यासाठी चालूच राहील, असे फौंडेशनने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
‘या’ अभिनेत्रीसोबत शुभमन गिल अडकणार लग्नबंधनात?
प्रताप होगाडे यांची महाराष्ट्र चेंबरच्या पॉवर टॅरिफ समितीच्या चेअरमनपदी नियुक्ती
ऐश्वर्या रायसोबत घटस्फोट घेत असल्याची अभिषेक बच्चनची घोषणा