उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का! अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांना मोठा धक्का (political consulting firms)देण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी हा राजकीय धक्का दिला आहे. खासदार संजय देशमुख यांच्या अनेक युवक समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या समक्ष शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश घेतला आहे. दिग्रस येथील विश्रामगृह येथे राठोड यांच्या उपस्थितीत या शेकडो युवकांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलाय.

खासदार संजय देशमुख यांच्या दिग्रस शहरातील गवळीपुरा परिसरातील (political consulting firms)युवकांचा व मुस्लिम बांधव, कार्यकर्ते यांचा यात समावेश आहे. तर दुसरीकडे, नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्याबद्दल शिवसेना ठाकरे गटात नाराजी असल्याने प्रवेश घेतल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकारणात मोठे फेरबदल होतांना दिसत आहेत. अशातच गेल्या दोन दिवसांपूर्वी नेर तालुक्यातही खासदार संजय देशमुख यांच्या समर्थकानी साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राठोड यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

यात बाजार समितीचे आणि मध्यवर्ती बँकेचे संचालक, ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिग्रस मतदारसंघात ताकद वाढवण्याचा मंत्री राठोड यांचा प्रयत्न आहे. परिणामी त्याचेच एक पाऊल हे असल्याचे बोलले जात आहे.

असाच एक प्रकार यवतमाळच्या वनी विधानसभा क्षेत्रामध्ये दिसून आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाची गटबाजी वनी विधानसभा क्षेत्रामध्ये देखील उघडपणे दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या बॅनरवर माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी लावलेल्या बॅनरवर वनी विधानसभा अध्यक्ष संजय देरकर यांचा फोटो लावण्यात आला नाही. तर संजय दरेकर यांनी लावलेल्या बॅनर वरून माजी आमदार विश्वास नांदेकर यांचा फोटो गायब करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये या गटबाजीचा मोठा . फटका शिवसेना ठाकरे गटाला बसणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या चढाओढीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी या गटबाजीमुळे संभ्रमात पडले आहे. संजय दरेकर आणि विश्वास नांदेकर यांचे गृहयुध्द उघडपणे दिसून आले आहे. विश्वास नांदेकर हे शिवसेना जिल्हाप्रमुख आणि विधानसभेचे आमदार होते. तर संजय दरेकर यांनी 2021 मध्ये शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर त्यांना वनी विधानसभा अध्यक्ष पदाचे पद देण्यात आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त वनी शहरांमध्ये मोठमोठे बॅनर लावण्यात आले. या बॅनर वरून शिवसेना ठाकरे गटाची जी गटबाजी आहे ती आज उघडपणे दिसून आली असून जिल्ह्यात आज हा चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्‍णा-पंचगंगा नदी काठावरील ९९ हेक्‍टर भाजीपाला महापुरात बुडाला

‘माझी लाडकी बहिण निवडणुकीपुरती.. एक, दोन हप्तेच मिळणार’ : शरद पवार

तब्बल 30 वर्षांनंतर सूर्य आणि शनी आमने-सामने; ‘या’ राशी कमावतील चिक्कार पैसा