मराठा आरक्षण आणि सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी(reservation) जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसणार आहेत. पोलिसांकडून परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत. त्यामुळे परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे कारण दाखवून जालना जिल्हा पोलिसांनी(reservation) परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील हे आजपासून अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू करणार आहेत. सगेसोयरेबाबत सरकारने निर्णय घ्यावा यासाठी हे उपोषण असणार आहे. ४ जूनपासूनच मनोज जरंगे पाटील उपोषणाला बसणार होते. मात्र पोलिसांनी त्यावेळी आचारसंहिता असल्याने आंदोलन करता येणार नाही असे सांगून परवानगी नाकारली होती.
अंतरवाली सराटीमध्ये या आंदोलनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने टीन पत्र्याचा शेड तयार करण्यात आला आहे. पाठिंबा देण्यासाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी जागा वाढविण्यात आली आहे. तसेच परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आलीय.
मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणाला गावकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतरही आजपासून जरांगे पाटील यांनी उपोषणाचे अस्त्र उपसले आहे. याच पार्श्वभूमीवर अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एक डीवायएसपी, चार पीआय, १४ पीएसआय, एपीआयसह २७५ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यात १२० एसआरपीएफचे जवान, २४ दंगा नियंत्रण पथकांचा समावेश आहे.
हेही वाचा :
नरेंद्र मोदींच्या विजयाने राहुल गांधी झाले मालामाल
‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला; शिवसेना ठाकरे गटाचा मोदींना टोला
समृध्दी महामार्गावर वैजापूरजवळ कार ट्रकला धडकली तिघांचा जागीच मृत्यू