मराठा आरक्षण मिळत नाही, डोक्यावर कर्ज; चिठ्ठी लिहून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण(reservation) मिळत नसल्याने राज्यात आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या आहे. आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरात मराठा आरक्षणासह डोक्यावर असलेल्या कर्जामुळे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी येथील तरुणाने गळफास(reservation) घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली. दत्ता कैलास महिपाल (वय २२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो मूळ बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातला रहिवासी असून वडगाव कोल्हाटी येथे तो वास्तव्यास होता.

दत्ता महिपाल या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांना तरुणाच्या खिशात ही चीट्ठी आढळून आली. या चिठ्ठीत त्याने बँकेकडून घेतलेले कर्ज भरता न आल्याने आणि मराठा आरक्षण मिळत नसल्याने आपण आत्महत्या करत आहोत, त्यामुळे मम्मी पप्पा मला माफ करा; असा मजकूर लिहिला आहे.

दरम्यान या मृत्यूप्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा :

वस्त्रनगरीत यंत्रमागधारकांना वीज दरवाढीचा झटका!

टी-20 वर्ल्ड कपपूर्वी BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये!

विजयी गुलाल कोण उधळणार? मनसे- शरद पवार गटात लागली १ लाखाची पैज!