मराठी माणसाला मारहाण; आदित्य ठाकरे आक्रमक

मुंबई: सरकारी अधिकारी अखिलेश शुक्ला याने गुंडांकडून एका मराठी कुटुंबाला मारहाण करण्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला. तुम्ही मासे खाणारे मराठी माणसं घाण, भिकारी आहात, तुमचे मराठीपण बाहेर काढतो. असं म्हणत त्यांने मराठी कुटुंबियांना मारहाण केली होती. या घटनेवरून राज्याचं राजकारणही(political news) चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, कल्याणमध्ये जे काही घटना दुर्दैवी आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांचे सरकार आता या वादाला हवा देतायेत का, असा सवाल आदित्य ठाकरे यंनी उपस्थित केला आहे. तसेच, मागच्या महिन्यातही एका महिलेला मारवाडीत बोलण्यास भाग पाडले गेले.

मुंबई आणि महाराष्ट्र (political news)आमचा आहे. मुंबई आधी महाराष्ट्राची आहे. नंतर या देशाची आहे. तुम्ही या, रहा, काम करता. काही हरकत नाहीत पण मराठी माणसाला हतयाराने मारले, जर कोणी त्यांचं तोंड फोडलं तर पोलिसांनी बोलायच नाही. हे जे कोणी अधिकारी आहेत ते एमटीडीसी मधले आहेत.

त्यामुळे मराठी माणसाला मटण-मांस खाण्यावरून बोलले जात असेल तर अशा ते पार्सल जिथून आले आहे तिथून आले आहे तिथे त्याला पाठवून द्यावे, मुंबई किंवा महाराष्ट्रात शाकाहारी सोसायटी करायचा प्रयत्न होत असेल तर त्याची ओसी रद्द केली पाहिजे, मराठी माणसांना घरं दिली नाही तर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला कोणी दाबण्याचा किंवा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर महाराष्ट्र द्रोहाचा गुन्हा दाखल करावा, कोणी दादागिरी करत असेल तर पोलिसांनीही त्याला दांडका काय असतो, हे दाखवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र प्रेमी आणि या मातीतले असतील तर त्यांनी आमच्या मागणीला मान देऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र द्रोहाचा कायदा आणतील, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

कल्याणमधील योगीधाम परिसरातील अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा हाईटसमध्ये राहणारे आजूबाजूला राहतात. अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता देवपूजा केल्यानंतर घराच्याबाहेर धूप लावायच्या. या धुपाचा धूर कळवीकट्टे यांच्या धरात जायचा. कळवीकट्टे यांच्या घरात लहान मुल आणि वयोवृद्ध आईला धम लागायचा. त्यामुळे कळवीकट्टे यांनी त्यांना घराबाहेर धूप न लावण्याची विनंती केली होती. पण त्यावरून शुक्ला यांच्या पत्नीने त्यांच्यासोबत मुद्दामपणे वाद घालण्यास सुरूवात केली.

हा वाद सुरू असतानाबाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण शुक्लाला याचा राग आल्याने शुक्लाने 10-15 गुंडांना बोलावून देशमुख बंधुंना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.

यात दोन्ही देशमुख बंधू गंभीर जखमी झाले. त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात अधिक माहिती मिळवली असता या सोसायटीत अखिलेश शुक्ला हे वादग्रस्त व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. शुक्लाने यापूर्वीही अनेक मराठी माणसांना त्रास दिला आहे. शुक्लांविरोधात अनेक नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.

हेही वाचा :

महायुतीकडून ‘या’ लाडक्या बहिणींना मिळाला धोका?

लोकसभा झाल्या, विधानसभाही संपल्या आता लागले महापालिका निवडणुकीचे वेध

स्नायू कमकुवत, उंचीत वाढ; अंतराळात सुनीता विल्यम्सच्या शरीराचे होतेय नुकसान?