2024-25 हे आर्थिक वर्ष आता शेवटाच्या टप्प्यात आहे. 31 मार्च 2025 ही तारीख अनेक महत्त्वाच्या आर्थिक कामांसाठी अंतिम आहे. काही योजना बंद होणार असून, काही प्रक्रियांसाठी ही शेवटची संधी आहे. जर तुम्ही या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत, तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊया अशाच पाच महत्त्वाच्या डेडलाईन्स ज्या 31 मार्चपूर्वी पूर्ण करणं आवश्यक आहे.
केवळ महिलांसाठी असलेल्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेत गुंतवणुकीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. या योजनेअंतर्गत किमान 1,000 रुपये ते कमाल 2 लाख रुपये गुंतवता येतात. या योजनेत वार्षिक 7.5% निश्चित व्याज मिळतं. जर तुम्ही अजून गुंतवणूक केली नसेल, तर लवकरात लवकर पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये संपर्क साधा.
कलम 139(8A) अंतर्गत जर तुम्ही 2021-22 आर्थिक वर्षासाठी आयटीआर फाइल केला नसेल किंवा चुकीची माहिती भरली असेल, तर 31 मार्च 2025 ही शेवटची संधी आहे. सरकारने करदात्यांना चुका सुधारण्यासाठी ही “अपडेटेड रिटर्न” सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही संधी गमावल्यास दंड आणि तपासणीची शक्यता वाढते.
कर वाचवण्यासाठी गुंतवणुकीची अंतिम मुदत :
कर वाचवणाऱ्या गुंतवणुकीसाठी 31 मार्च ही शेवटची तारीख आहे. जर तुम्ही या तारखेपूर्वी गुंतवणूक केली नाही, तर 2024-25 च्या ITRमध्ये कर सवलत मिळणार नाही. त्यामुळे गुंतवणुकीची योग्य योजना करून ती लवकर पूर्ण करा.
पीएम इंटर्नशिप योजनेत अर्ज करण्याची अंतिम तारीख :
विद्यार्थ्यांसाठी ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप स्कीम’ ही सुवर्णसंधी आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे. याआधी 12 मार्च ही अंतिम तारीख होती, मात्र ती वाढवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शासकीय विभागांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळते.
लघु बचत योजनांवरील व्याजदराचा लाभ :
PPF, NSC, KVP, Senior Citizen Savings Scheme यांसारख्या लघु बचत योजनांवर जानेवारी-मार्च तिमाहीतील व्याजदर 31 मार्च रोजी संपणार आहे. नवीन तिमाहीपासून व्याजदरात बदल होऊ शकतो. त्यामुळे विद्यमान व्याजदराचा लाभ घेण्यासाठी 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करणे फायद्याचं ठरू शकतं.
हेही वाचा :
भाजपच्या ‘या’ आमदाराची पक्षातूनच हकालपट्टी; सहा वर्षांसाठी काढून टाकलं
विमानतळावर महिलेचा नंगानाच पाहून प्रवाशी हादरले, पाहा व्हायरल व्हिडीओ!
‘ओ, कलेक्टर गाड्या कुठे आहेत?’; अजित पवारांचा पारा चढला अन् ‘हा’ आदेशच देऊन टाकला