मारुती सुझुकीच्या कार झाल्या महाग! जाणून घ्या नवीन किंमती

भारतीय वाहन बाजारातील आघाडीची कंपनी मारुती सुझुकी ने आपल्या एरिना (automobile)डीलरशिप मधील अनेक कारच्या किंमती वाढवल्या आहेत. काही मॉडेल्समध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ करण्यात आली आहे, तर काही कारच्या किंमती पूर्ववत आहेत. नवीन किंमतीनुसार आता कोणती कार किती महाग झाली आहे, याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.मारुती सुझुकीच्या सेलेरियो मॉडेलच्या किंमतीत ₹32,500 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. ZXI Plus AMT वेरिएंटमध्ये ही वाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या वेरिएंटची एक्स-शोरूम किंमत आता ₹7.37 लाख झाली आहे. बेस वेरिएंटची किंमत आता ₹5.64 लाखांपासून सुरू होईल.

मारुती सुझुकीच्या सर्वात स्वस्त कारपैकी एक असलेल्या ऑल्टो K10 Alto K10 ची किंमत ₹19,500 ने वाढली आहे. ही वाढ VXI Plus वेरिएंटमध्ये लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या वेरिएंटची नवीन किंमत ₹5.99 लाख झाली आहे. त्याच वेळी, बेस वेरिएंटची किंमत आता ₹4.09 लाखांपासून सुरू होईल.लोकप्रिय हॅचबॅक स्विफ्ट साठी ग्राहकांना आता ₹5,000 जास्त मोजावे लागणार आहेत. स्विफ्टच्या सर्व वेरिएंट्सच्या किमतीत ₹5,000 ची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे बेस वेरिएंटची नवीन एक्स-शोरूम किंमत ₹7.79 लाख (automobile)झाली आहे, तर टॉप वेरिएंटची किंमत ₹9.65 लाखांवर गेली आहे.

कॉम्पॅक्ट सेडान मारुती डिजायर च्या किंमतीत ₹10,000 ची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ VXI आणि ZXI वेरिएंटसाठी लागू आहे, तर इतर वेरिएंट्सच्या किमतीत ₹5,000 ची वाढ झाली आहे. नवीन दरानुसार बेस वेरिएंटची किंमत ₹7.84 लाख, तर टॉप वेरिएंटची किंमत ₹10.19 लाख झाली आहे. मारुती सुझुकीच्या कॉम्पॅक्ट SUV ब्रेझा च्या किंमतीत ₹20,000 ची वाढ करण्यात आली आहे. LXI आणि LXI CNG वेरिएंट्सवर ही वाढ लागू आहे, तर इतर वेरिएंट्सच्या किमती पूर्ववत आहेत.

वॅन सेगमेंटमधील मारुती ईकोच्या किंमतीत ₹12,000 ची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता या कारची नवीन एक्स-शोरूम किंमत ₹5.44 लाख ते ₹6.70 लाख च्या(automobile) दरम्यान असेल. मारुती सुझुकीने गाड्यांच्या किमती वाढवल्याने ग्राहकांना आता काही कार खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागतील. मात्र, काही वेरिएंट्स अजूनही पूर्वीच्या किमतीत उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर या किमती लक्षात ठेवून योग्य निर्णय घ्या.

हेही वाचा :

कार्यक्रम पोलिसांचा आहे, शिट्या बंद करा, अन्यथा…; अजित पवारांनी भरला दम

BSNL च्या ग्राहकांसाठी गुड न्यूज; कंपनीने आणले सर्वात स्वस्त प्लॅन

रांझा तेरा हीरिये: व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार नवीन रोमँटिक गा