मारुतीची सर्वात स्वस्त कार ‘या’ दिवशी होणार लाँच

मारुती सुझुकीच्या गाड्या(car) भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या बहुतांश गाड्या देशातील रस्त्यांवर धावताना दिसतात. आता मारुती आपल्या सर्वात लोकप्रिय कारपैकी एक, मारुती डिझायरचे नवीन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. मारुतीची ही नवीन कार येत्या 4 नोव्हेंबरला लाँच होणार आहे.

मारुती कंपनीसाठी ही एक मोठी गोष्ट शकते, कारण Maruti Dezire ही या कार(car) निर्मात्याची सर्वाधिक विक्री होणारी कार आहे. नवीन पिढीच्या मॉडेलसह ही कार जितकी अधिक प्रीमियम होईल तितकी या कारची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. या कारमध्ये अनेक प्रकारचे अपडेट्स देण्यात आले आहेत.

स्विफ्टच्या तुलनेत मारुती डिझायरचा लूक वेगळाअसणार आहे. या नवीन वाहनाचा आतील भाग स्विफ्टच्या वाहनाशी किंचित सारखा असणार आहे. तसेच या कारमधील डॅशबोर्ड स्विफ्ट प्रमाणे असणार आहे, परंतु त्याच्या अपहोल्स्ट्रीची सावली फिकट रंगात आढळू शकते. डिझायरमधील ही नवीन शेड या वाहनाला आणखी प्रीमियम लूक देत आहे.

नवीन मारुती डिझायर 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह सुसज्ज असू शकते. यासोबतच या कारमध्ये मागील एसी व्हेंट्स, क्लायमेट कंट्रोल, एक सनरूफ, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी आणि 360-डिग्री कॅमेरा ही फीचर्स मिळू शकतात. या कारला नवीन इंजिन देखील मिळणार आहे, जे मारुती स्विफ्टपेक्षा थोडे वेगळे असेल. या नवीन इंजिनमुळे ही कार अधिक वजन सहन करू शकणार आहे.

मारुतीच्या या डिझायर कारची किंमत सुमारे 7 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते. याचे पेट्रोल मॅन्युअल व्हेरियंट या रेंजमध्ये येऊ शकते. टॉप-एंड पेट्रोल AMT व्हेरियंटची किंमत 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

शिक्षकाच्या अंगात भूत शिरले की काय? अचानक वर्गात करू लागले विचित्र कृत्य

अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर जाणूनबुजून केलेला कट?, आव्हाडांच्या पोस्टने उडाली खळबळ

विधानसभेपूर्वी अजित पवारांना धक्का, मिळणार नवीन चिन्ह?