कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोणताही नट, अभिनेता हा भूमिकेत शिरताना, परकाया प्रवेश(politics) करताना स्वतःच्या चेहऱ्यावर भूमिका असलेल्या व्यक्तिरेखेचा मुखवटा घालतो आणि तो प्रेक्षकांना दिसतही नाही. राजकारणीही असाच मुखवटा घालून जनतेसमोर वावरत असतात. लोक मात्र ह्या मुखवट्यालाच खरा चेहरा समजतात आणि फसतातही. आता काही राजकारण्यांनाही स्वतःची ओळख लपवण्यासाठी वेशांतर करून गल्लीतला गोंधळ निस्तरण्यासाठी दिल्लीत मुजरा करण्यासाठी जावे लागते. मूळ पक्षातील एका मोठ्या गटाला फोडून स्वतःबरोबर नेण्यासाठी सिक्रेट मिशन राबवणाऱ्या एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांना वेशांतर करावं लागलं होतं असं आता दोन-तीन वर्षानंतर सामोरं आलं आहे.

40 /45 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांना “हारुन अल रशिद” बनून मध्यरात्रीची(politics) मुंबई पाहण्याची इच्छा झाली. मध्यरात्री नंतरची किंवा भूमिगत मुंबईची खडानखडा, सखोल माहिती असणारे शिवसेनेचे प्रमोद नवलकर हे एकमेव आमदार होते. मुख्यमंत्री अंतुले यांना नवलकर यांनी भूमिगत मुंबईची मध्यरात्री सैर घडवून आणली होती. कोणत्याही प्रकारची सुरक्षा न घेता हे दोघेजण मुंबईत मध्यरात्री फिरले. भूमिगत मुंबईतले अवैध व्यवसाय पाहून मुख्यमंत्री अंतुले हे तेव्हा थक्क झाले होते. त्यानंतर त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा घेतले. वेशांतर करून फिरणारे ते पहिले राजकारणी होते. त्या मागचा त्यांचा हेतू निखळ आणि स्वच्छ होता.
दिनांक 20 जून 2022 च्या मध्यरात्रीनंतर तत्कालीन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे काही आमदारंना सोबत घेऊन अचानक नॉट रिचेबल झाले. शिवसेना हा मजबूत पक्ष फोडण्याच्या वास्तवदर्शी नाटकाचा पहिला प्रयोग सादर करण्यापूर्वी त्यांनी आधी काही दिवस वेशांतर करून या नाटकाच्या तालमी घेतल्या होत्या. या नाटकाचे सूत्रधार आणि निर्माते देवेंद्र फडणवीस हेच होते. संजय राऊत यांनी महायुतीच्या प्रयोगामागची एकनाथ शिंदे यांच्या वेशांतराची माहिती आता सांगितली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रवीण दरेकर म्हणतात की हा शिळ्या कढीला पुन्हा उकळी देण्याचा प्रकार आहे. म्हणजे कढी आम्हीच बनवली होती हे ते कबूल करतात.” महायूती” चा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकीय मंचावर सादर होण्यापूर्वी गुजरातच्या सुरत आणि आसामच्या गोहाटी येथे त्याच्या रंगीत तालमी झाल्या आणि या रंगीत तालमींना देवेंद्र फडणवीस हे सुद्धा वेशांतर करून उपस्थित होते.
शरद पवार यांच्या हातातील घड्याळ(politics) काढून घेऊन ते स्वतःच्या हातावर बांधण्याचा अजितदादा पवार यांचा प्रयत्न यशस्वी होण्यापूर्वी त्याची तयारी त्यांनी कितीतरी आधीपासून सुरू केली होती. ते त्यांनीच नवी दिल्लीत मीडियाशी बोलताना सांगून टाकले आहे. त्याचेही निर्माते आणि सूत्रधार देवेंद्र फडणवीस हेच होते. कारण त्यांनी दोन्ही पक्ष मीच फोडले हे यापूर्वीच सांगून टाकले आहे कबूल केले आहे. आपण मुंबईहून नवी दिल्लीत जाताना वेशांतर केले होते. तोंडाला मास्क आणि डोक्यावर टोपी घालून चेहरा लपवून मी तब्बल दहा वेळा अमित शहा यांना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झालं होतो. विमानाचा तिकीट काढताना त्यांनी काही वेळा ए.ए. पवार असे संक्षिप्त नाव धारण केले होते.

दिनांक 3 जुलै 2023 रोजी पक्ष फुटीची घोषणा करून अजित दादा पवार यानी इतर आठ नेत्यांना बरोबर घेऊन शपथविधीसाठी राजभवन गाठले होते. चेहरा अगदी कोरा करकरीत ठेवून छगन भुजबळ हे शरद पवार यांना भेटून”काय चाललय ते बघून येतो”असे सांगून थेट राजभवनावर गेले आणि मंत्री पदाची त्यांनी शपथच घेतली.
शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला सुद्धा समजले नाही. म्हणजे छगन भुजबळ यांनी किती उत्तम प्रकारचा मुद्राभिनय केला असेल याची कल्पनाच केलेली बरी. महाराष्ट्रातील असे बरेच काही राजकारणी आहेत की त्यांचा मुद्राभिनय हा वास्तवातील अभिनेत्याला सुद्धा मागे टाकणारा आहे. निवडणूक प्रत्यक्षात लढवताना, आणि निवडणूक जिंकल्यानंतर त्यांचा मुद्राभिनय हा वेगवेगळा असतो.
हेही वाचा :
‘गुलाबी साडी’ गाण्यामागची कहाणी: संजू राठोडने सांगितली यशाची कथा
बहिणींना पैसे नको, सुरक्षा हवी! काँग्रेसने शिंदे आणि फडणवीसांवर साधला निशाणा
शिवसेना नेत्याच्या मुलाचा विरारमधील रिसॉर्टमध्ये रहस्यमय मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद