मुंबई : राज्यामध्ये विधानसभा(political updates) निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. निवडणुकीमध्ये महायुतीला एकतर्फी घवघवीत यश मिळाले आहे. मात्र महायुतीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपामध्ये महायुतीच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीला निवडणुकीमध्ये मोठा फटका बसल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्यावरुन आवाज उठवला. मात्र आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कार्यपद्धती आवडू लागली असून त्यांचे कौतुक केले जात आहे.
महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन देखील मोठी चर्चा झाली. अखेर भाजप नेते देवेंद्र फडणवीस(political updates) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पुन्हा एकदा एन्ट्री केली. याचबरोबर अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर एकनाथ शिंदे यांचा सक्रीय राजकारणामध्ये कमी वावर दिसू लागला आहे. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे एक्शनमोडमध्ये आले आहेत.
अनेक योजनांचे अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस हे झपाट्याने घेत आहेत. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यपद्धतीचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत स्तुतीसुमने गायली आहेत. संजय राऊत म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सरकारशी किंवा त्यांच्याशी नक्कीच आमचे राजकीय मतभेद आहेत.
राजकीय मतभेद असल्यावर एकमेकांवर टीका होते, महाराष्ट्रातील राजकारण टीकेपुरता मर्यादित राहिलेला नाही तर आता जहरी टीका व्हायला लागली आहे तरीही आपण राज्याचे काही देणं लागतो. त्यांनी एखादे चांगलं पाऊल उचललं असेल आणि ते राज्याची कायदा सुव्यवस्था, राज्याची सामाजिक समीकरणे यांना दिशा देणारं असेल तर सर्व राजकीय वैर दूर ठेवून त्याचा कौतुक केलं पाहिजे ही शिवसेनेची भूमिका हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून आहे. देवेंद्र फडणवीस यांचा कौतुक का करू नये ?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले की, “गडचिरेली, चंद्रपूर ही सुवर्णभूमी असून मुख्यमंत्र्यांनी जसं सांगितलं की ती पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल, जमशेदपूर नंतर गडचिरोली ही पोलाद सिटी बनवणार असतील आणि तिकडच्या बेरोजगारांच्या हाती काम मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे.
फडणवीस यांच्यासमोर दहा खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं, त्यांनी संविधान हाती घेतलं याचा प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला कौतुक वाटलं पाहिजे. गडचिरोलीत विकासाची गंगा वाहत असेल तर त्याचे जर कोणी कौतुक करणार नसेल तर ते चुकीचं आहे. नक्षलवाद नष्ट होणार असेल आणि मुख्यमंत्र्यांनी पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे त्याचे अभिनंदन आणि कौतुक करणं आपल्या सर्वांचं काम आहे,” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
त्याचबरोबर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, “महायुतीच्या सरकारला या महाराष्ट्रातील जनतेने मोठे मताधिक्य दिले आहे.
मात्र कामाबाबत मात्र इतर सर्व नेते व मंत्री मागे आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी आता चार्ज घेतला पाहिजे होता. सरकार येऊन दीड महिना झालेला आहे, पण राज्यात फक्त देवेंद्र फडणवीस हेच ॲक्शनमोडमध्ये दिसत आहेत. मुख्यमंत्री हेच काम करताना दिसत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या टीमने देखील या नवीन वर्षामध्ये कामाला सुरुवात करावी,” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा :
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर तीन माजी नगरसेवकांची शिवसेनेतून हकालपट्टी
स्वस्तात मस्त बेस्ट फॅमिली कार; किया सिरोसचे बुकिंग सुरू, डिलिव्हरी कधी मिळेल?
‘आपण कदाचित रोहित शर्माला…’, गावसकरांचं भाकीत! रवी शास्त्रीही म्हणाले, ‘टॉसदरम्यान…’