महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला यंदा एकाच टप्प्यात मतदान पार पडले. त्यानंतर आज २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होत आहेत. राज्यातील विधानसभा(Assembly) निवडणुकांसाठीचा पोस्टल मतदानाचा निकाल हाती येत असून कोणाचं पारडं जड राहणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे. सगळ्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून महत्त्वपूर्व निर्णय घेण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी दोन्ही पक्षांकडून आधीच काळजी घेण्यात येत आहे.
आज महाराष्ट्रातील विधानसभा(Assembly)निकाल जाहीर होत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत रंगली होती. दोन गटांमध्ये कोणाची सरशी होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आणि शरद पवार गट अलर्ट मोडवर आहेत. निवडून आल्यानंतर आपण पक्षासोबतच राहू असं प्रतिज्ञापत्र पक्षातील सर्व उमेदवारांकडून घेण्यात आले आहे. पक्षात याआधी पडलेली फूट लक्षात घेता आगामी काळात पुन्हा दगाफटका होऊ नये यासाठी आधीच काळजी दोन्ही पक्षाकडून घेण्यात येत आहे. तसेच नाशिकच्या ओझर येथे खासगी विमानं देखील तैनात करण्यात आले आहेत.
जळगाव जामोदमधून भाजपचे संजय कुटे आघाडीवर तर जामनेरमधून गिरीश महाजन आघाडीवर आहेत. तर नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित आघाडीवर आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघात राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असून त्यांचं या मतदारसंघात वर्चस्व आहे. या मतदारसंघातील ते विद्यमान आमदार आहेत. यंदाच्या निवडणुकीतही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांचा राष्ट्रवादी गट अशी लढत या मतदारसंघात आहे.
हेही वाचा :
काकाच पुतण्यावर सरस! दुसऱ्या फेरीत लीड दुप्पटीने वाढवला
राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला; ‘या’ नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात
“शिल्पा शेट्टीवरील 11 वर्षे जुन्या खटल्यात न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय!”