विधानसभा निवडणुकीत(political news) महाविकास आघाडीला दणदणीत पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवाचा खापर ईव्हीएमवर फोडण्याचा प्रयत्न आघाडीच्या नेत्यांनी केला होता. परंतु, हा मुद्दा आता मागे पडला आहे. महाविकास आघाडीचे नेते आता एकमेकांवरच आरोप प्रत्यारोप करू लागले आहेत.
काँग्रेस(political news) आमदार विजय वडेट्टीवार यांनी पराभवासाठी जागावाटपाला कारणीभूत ठरवलं. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावर जोरदार टोलेबाजी केली आहे. महाविकास आघाडीत समन्वय नाही हे सु्द्धा त्यांनी मान्य केलं. महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होतं. विजय वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
राऊत पुढे म्हणाले, जागावाटपाची प्रक्रिया उगाच लाबंवली, हे आमचं सर्वांचं मत आहे. ती का लाबंली हे वडेट्टीवारांना माहिती असावं. महायुतीचं जागावाटप आमच्या दोन महिने आधीच संपलं होतं. वडेट्टीवारांची खंत ही संपूर्ण महाविकास आघाडीची खंत आहे. होय, चुका झाल्या पण आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसला सर्वात जास्त जागा हव्या होत्या आणि त्यांच्या सर्वात कमी जागा निवडून आल्या.
जागावाटपाला उशीर झाला हाच मुद्दा आहे. वडेट्टीवारही जागावाटपात होते. विदर्भातील ज्या जागा ते पराभूत झाले त्या जागा त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला सोडल्या असत्या तर बरं झालं असतं. चंद्रपूरचे किशोर जोरगेवार यांनी शरद पवार गटाकडून लढण्यास तयार असल्याचं पत्रही दिलं होतं. शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ती जागा सोडा म्हणून वारंवार सांगत होते पण त्यांनी ऐकलं नाही. 17 दिवस त्या जागेवर घोळ घातला गेला. जोरगेवार मात्र भाजपात गेले आणि निवडूनही आले.
महाविकास आघाडीसोबत इंडिया आघाडीचीही बैठक व्हायला हवी होती, जी झाली नाही. याचा फटका सर्वांनाच बसला. इंडिया आघाडी लोकसभेसाठी तयार झाली होती पण प्रत्येकजण आपलंच घोडं दामटवत राहिला. आघाडी टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची होती, तो सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. पण त्यांना ते जमलेलं नाही. इंडिया आघाडी विसर्जित करणं हे फार मोठं विधान होईल असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा :
‘गंभीरने माझ्या कुटुंबाला शिव्या दिल्या आणि…’; क्रिकेटरचा भारतीय हेड कोचवर गंभीर आरोप
ट्रम्प यांना अटक होणार का? सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला
‘आठवड्यातून 90 तास काम करा’वरुन दीपिकाने थेट L&T अध्यक्षांना सुनावलं