महाराष्ट्राच्या राजकीय(political) वर्तुळात मोठा उलथापालथ होण्याची चिन्हं दिसत आहेत. महाविकास आघाडी (मविआ) महायुतीविरोधातील लोकभावना वाढवण्यासाठी धक्कातंत्राचा वापर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) समरजितसिंह घाटगे यांचा ३ सप्टेंबरला प्रवेश होणार आहे. यानंतर मविआत दर आठवड्यात किमान दोन पक्षप्रवेश होतील, अशी चर्चा आहे.
महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांच्या मते, अजित पवार गटातील अनेक नेते आणि महत्त्वाच्या पदांवर असलेले भाजप नेते शरद पवार यांच्या गटात सामील होण्याची तयारी करत आहेत. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा ‘तुतारी’चा निर्णय महायुतीसाठी धक्कादायक ठरू शकतो.
राज्यात सत्ता बदलाच्या चर्चांना अधिकच बळकटी मिळत असून मविआची ही हालचाल महायुतीला मोठं आव्हान ठरू शकतं.
हेही वाचा:
पासपोर्ट अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील पाच दिवस सेवा बंद;
“उद्धव ठाकरेंची खरंच दया येते…” देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
दहिसर येथील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक