‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुख आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्टार (star) प्रवाहच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेत मयुरी देशमुख एन्ट्री करणार आहे. सहा वर्षांनंतर मयुरी मराठी मालिकेत दिसणार आहे. मयुरी देशमुखच्या येण्याने मालिकेत धमाकेदार ट्विस्ट येणार आहे. स्टार प्रवाहची मन धागा धागा जोडते नवा मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत मयुरी देशमुखची एण्ट्री होणार असून सुखदा ही व्यक्तिरेखा मयुरी साकारणार आहे. सुखदाच्या येण्याने आनंदी-सार्थकच्या आयुष्यातही नवं वळण येणार आहे.
व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडले- मयुरी
आयुष्य भरभरुन जगणारी, बडबडी आणि अतिशय सकारात्मक अतिशय ही व्यक्तिरेखा आहे. या पात्राविषयी ऐकताक्षणीच मी प्रेमात पडले. स्टार प्रवाहसोबत काम करण्याची इच्छा देखील पूर्ण होतेय. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही मालिका जरूर पाहावी. आमच्या कामावर प्रेक्षकांनी प्रेम कराव, एवढीच इच्छा आहे, असंही मयुरीने म्हटलं आहे.
कोण आहे मयुरी देशमुख?
‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेमुळे मयुरी देशमुख घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या कामाचं प्रचंड कौतुकही झालं. त्यानंतर मयुरीने हिंदी मालिकांमध्ये काम केलं. स्टार प्लसवरच्या ‘इमली’ या मालिकेत मयुरीने काम केलंय. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका केली होती. शिवाय ‘लग्न कल्लोळ’ सिनेमातही तिने काम केलंय. तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. आता ती ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुखदाच्या येण्याने सार्थक-आनंदीच्या आयुष्यात काय बदल घडतील हे पुढच्या भागांमधून उलगडेल.
हेही वाचा :
विदर्भात वादळीवाऱ्याने चक्क पोलीस ठाण्याचे छप्परच गेले उडवून
मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर, नितीन गडकरी यांच्याकडे महत्त्वाचं खातं
इचलकरंजीत आजपासून टेम्पो चालकांचे काम बंद!