दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कांद्याचे लिलाव सुरु, प्रतिक्विंटल कांद्याला 6161 रुपयांचा दर

आज साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक असणारा दसऱ्याचा शुभमुहूर्त आहे. या सणाचा देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नाशिकच्या उमराणा बाजार समितीमध्ये आज नवीन लाल कांद्याच्या(Onion) लिलावाला सुरुवात झाली आहे. लिलावाच्या सुरुवातीच्या दिवशीच कांद्याला प्रतिक्विंटल 6161 रुपयांचा दर मिळाला आहे. उमराण्याच्या राजेंद्र देवरे यांच्या बैलगाडीला लिलावाचा मान मिळाला आहे. आज बाजार समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

कसमादे परिसरातील मोठी बाजार असा नावलौकिक असलेल्या उमराणा बाजार समितीमध्ये दसऱ्याला नव्या लाल कांद्याच्या(Onion) लिलावाचा सीमोल्लंघन करण्याची व मुहूर्ताला लाल कांद्याला जास्त भाव देण्याची परंपरा आहे. आज दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी बाजार समिती सुरू ठेवण्यात आली होती. उमराण्याच्या राजेंद्र देवरे यांच्या बैलगाडीला लिलावाचा मान मिळाला.बाजार समितीच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या दरामुळं शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

यंदा देशभरात चांगला पाऊस झाला आहे. सध्या परतीचा मान्सून देशातील अनेक भागात धुमाकूळ घालताना दिसत आहे. या पावसामुळं अनेक भागात शेती पिकांना फटका देखील बसला आहे. दरम्यान, सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला झल लागत असल्याचं बोललं जात आहे.

हेही वाचा:

बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानचा मोठा निर्णय!

महाराष्ट्र काँग्रेसची मोठी कारवाई; ‘या’ आमदाराला केले निलंबित; कारण…

वाढलेल्या प्लॅनमुळे मोबाईलधारक त्रस्त; महिना 30 दिवसांचा मग 28 दिवसांचा रिचार्ज कसा?