रेल्वे विभागात 3317 जागांसाठी मेगाभरती…

रेल्वे विभागात नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची(recruitment) बातमी आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या जबलपूरच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने अप्रेंटिस उमेदवारांच्या भरतीसाठी अधिकृतपणे नोंदणी प्रक्रिया सुरू केली. या भरती अतंर्गत एकूण 3317 प्रशिक्षणार्थी पदे भरली जाणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी भरती मोहीम ही एक महत्त्वाची संधी आहे.

शैक्षणिक पात्रता-
अप्रेंटिसशिपसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांनी(recruitment) संबंधित ट्रेडमध्ये ITI पूर्ण केलेले असावे.
या भरती अतंर्गत विविध ट्रेडमधील 3,317 अप्रेंटिस पद भरली जाणार आहेत. या भरतीसीठी अर्जदारांकडे संबंधित क्षेत्रातील आयटीआय पात्रता असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा-
5 ऑगस्ट 2024 रोजी उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत लागू आहे.

अर्ज शुल्क-
सामान्य, OBC आणि EWS उमेदवार: रु 141/-
SC, ST, PH आणि महिला उमेदवार: रु 41/-
अर्ज प्रक्रियेदरम्यान शुल्क ऑनलाइन भरावे लागेल. अर्ज शुल्क परत केले जाणार नाही.

RRC WCR अप्रेंटिस भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 ऑगस्ट 2024 रोजी सुरू झाली असून अर्ज कऱण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 आहे.

अधिकृत वेबसाइट – wcr.Indianrailways.gov.in.

निवड प्रक्रिया-
अप्रेंटिस उमेदवारांची निवड प्रक्रिया 10वी आणि ITI परीक्षांमध्ये मिळालेल्या गुणांवरून संकलित केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल. गुणवत्ता यादीच्या घोषणेनंतर उमेदवारांना कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठी बोलावले जाईल.

अधिसूचना –
https://wcr.indianrailways.gov.in/uploads/files/1722857192604-Act%20App%202024_25%20Notification%20Eng.pdf

अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2024/

अर्ज कसा करायचा
1) प्रथम wcr.indianrailways.gov.in या वेबसाईटवर जा.
2) ऍप्लिकेशन लिंक ऍक्सेस करा: डाव्या साइडबारमध्ये Engagement of act apprentices for 2024-25 या लिंकवर क्लिक करा.
3) त्यानंतर नोंदणी करून अर्ज भरा.
5) दस्तऐवज अपलोड करा: मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
6) उपलब्ध ऑनलाइन पेमेंट पद्धतींद्वारे फी सबमिट भरा.
7) त्यानंतर अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

उमेदवारांनी अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा. कारण, अर्जात कोणत्याही त्रुटी राहिल्यास अर्ज नाकारल्या जाईल, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

हेही वाचा :

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीला खिंडार? 

विनेश फोगाटला सर्वात मोठा दिलासा; काही तासांतच समोर येणार निकाल

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अखेर जामीन मंजूर