नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. (recruitment)महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अंतर्गत विविध तांत्रिक पदांसाठी 263 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना 3 मार्च 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.

कोणत्या पदांसाठी भरती? :
मेकॅनिक मोटार व्हेईकल – 55 पदे
मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर – 60 पदे
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल – 30 पदे
वेल्डर – 20 पदे
पेंटर – 06 पदे
डीझेल मेकॅनिक – 70 पदे
रेफ्रिजरेटर आणि एअर कंडीशनर टेक्निशियन – 10 पदे
इलेक्ट्रॉनिक्स तज्ञ – 10 पदे
अभियांत्रिकी पदवीधर – 02 पदे
पात्रता आणि आवश्यक अर्हता :
वयोमर्यादा: 16 ते 33 वर्षे
उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय ITI उत्तीर्ण (recruitment)असणे आवश्यक आहे.
ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी.
वेल्डर, पेंटर, इलेक्ट्रॉनिक्स, शीट मेटल वर्कर, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग यासारख्या तांत्रिक पदांसाठी उमेदवारांनी संबंधित ITI कोर्स पूर्ण केलेला असावा.
भरतीसाठी अर्ज कसा कराल?
इच्छुक उमेदवारांनी एसटी महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरावा.
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 3 मार्च 2025 आहे.
भरती प्रक्रियेसाठी योग्य शैक्षणिक कागदपत्रे आणि आवश्यक (recruitment)पात्रतेची पूर्तता करणे गरजेचे आहे.
सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी :
एसटी महामंडळात नोकरी मिळवण्यासाठी ही उत्तम संधी आहे. तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया भविष्यात चांगल्या संधी निर्माण करू शकते. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज सादर करावा.
हेही वाचा :
घटस्फोटापूर्वी चहलला धनश्रीबद्दल कळले होते सत्य जगासमोर व्यक्त केले आपले दुःख
स्वयंपाक झाला की गॅसवर मीठ नक्की टाका अन्… महिलेनं सांगितले चमत्कारीक फायदे
रेझर वापरल्याने होतील त्वचेच्या समस्या, तुमच्या त्वचेसाठी काय आहे धोका?