पुणे : पोर्शे कार अपघाताच्या घटनेने राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची झोप उडवली होती. भरधाव वेगाने आलेल्या पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांना जोरदार धडक दिली. यात दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. कोरेगाव पार्क परिसरात हा भयानक अपघात(accident) झाला होता. असे श्तानाच याच परिसरात अशीच हिट अँड रनची घटना उघडकीस आली आहे.
कोरेगाव पार्क परिसरातील गुगल बिल्डींगसमोर गुरुवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हिट अँड रनची घटना घडली, या अपघातात रौफ अकबर शेख नावाचा तरूण मृत्यूमुखी पडला आहे. अपघातानंतर(accident) कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातपग्रस्त तरुणाला रुग्णालयात दाखल केले. तसेच तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी आयुष प्रदीप तयाल नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष प्रदीप तयाल हा हडपसर येथील रहिवासी आहे. मद्यपान करून तो सुसाट वेगाने कार चालवत होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आयुष तयाल एबीसी रोड कडून ताडी गुता चौकाकडे निघाला होता. यावेळी त्याने पहिल्यांदा एका दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरून जाणारे तिघेही किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातात त्यांना किरकोळ मारही लागली. पण अपघातनानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला.
हेही वाचा:
गुड न्यूज! दसऱ्या आधीच सोनं झालं स्वस्त…
जात लपवण्यासाठी स्वीकारलं ‘बच्चन’ आडनाव, मग अमिताभ यांचं खरं Surname काय?
यंदा राज्यात होणार तब्बल 6 दसरा मेळावे; कुणाचा कुठे आणि कधी होणार मेळावा?