गोंदिया : कर्जाचे घेतलेले पैसे भरणार नाही, त्याचा भरणा तूच कर, असे म्हणून तरुणाशी तिघांनी भांडण केले. दरम्यान, मारहाण करत असताना मध्यस्थी करण्यास गेलेल्या त्याच्या आईलाही(woman) ढकलले. यादरम्यान पडून त्या महिलेचा हात मोडला. ही घटना सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी येथे मंगळवारी (दि. 8) घडली.
सडक अर्जुनी तालुक्यातील घोटी येथील रत्नकला राजू निकोरे (43) पतीला सोडून मुलासोबत वेगळी राहते. तिचा मुलगा धर्मेंद्र व वसंता ठाकरे यांनी देवराम देवरे याच्या नावे आदित्य अनघा सहकारी सोसायटी साकोली येथून 2023 मध्ये 35 हजार रुपयांचे कर्ज घेतले. दरम्यान, ते पैसे दोघांनीही वाटून घेतले.
धर्मेंद्रने हप्त्याने त्याने घेतलेली रक्कम सोसायटीत भरली. मात्र, वसंता ठाकरे याने पैसे भरले नाही. उलट मंगळवारी वसंत शिवराम ठाकरे (24, रा. डव्वा), प्रवीण वसंत मेश्राम (43) आणि नेहाल प्रवीण मेश्राम (19, दोन्ही रा. सेंदुरवाफाए जि. भंडारा) हे तिघेही एका कारने रत्नकला निकोरे यांच्या घरी आले. त्यांच्या मुलाला पूर्ण रक्कम तूच भर, असे म्हणत शिवीगाळ करून त्याला मारहाण केली.
दरम्यान, मध्यस्थी करण्यासाठी रत्नकला(woman) गेली असता ढकलल्याने ती खाली पडली. यात तिच्या हाताचे हाड मोडले. संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी वैद्यकीय अहवाल आणि तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
हेही वाचा:
‘या’ कारणामुळे सलमान खानसह बिग बॉस 18 अडचणीत सापडणार?
विधानसभा निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाचा स्वबळाचा नारा; काँग्रेसपासून होणार वेगळे?
करोडोंची कार चालवत होता गेला तोल, गाडीचा चक्काचूर अन् थरकाप उडवणारा Video