उमेदवारांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे….!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकांची(wealth) धांदल उडाली आहे. पूर्व विदर्भात पाच लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होते. उर्वरित महाराष्ट्रात निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना उमेदवारांनी आपल्याकडे स्थावर, जंगम, रोख, ठेवी, सुवर्ण अलंकार अशा माध्यमातून किती संपत्ती आहे याची विवरण पत्राच्या आधारे घोषणा करावयाची असते.

त्याप्रमाणे उमेदवारांनी संपत्तीची(wealth) विवरणपत्र दिली आहेत. त्याचा एकूण तपशील पाहता एकही उमेदवार गरीब नाही, सामान्य नाही, मध्यमवर्गीय नाही, उच्च मध्यमवर्गीयही नसून सर्वांची संपत्तीची उड्डाणे कोटीच्या कोटी असल्याने ते सर्वजण श्रीमंत, अति श्रीमंत आहेत आणि आश्चर्याची बाब म्हणजे एक महिला उमेदवार अशा आहेत की त्यांच्याकडे त्या अति श्रीमंत असूनही स्वतःचे वाहन नाही.

सातारा राजघराण्यातील उदयनराजे भोसले हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडे एकूण 252 कोटी रुपयांची संपत्ती असून वारसा हक्काने आलेली संपत्ती 174 कोटी रुपयांची आहे. त्यांच्याकडे 43 किलो सोने व चांदी आहे. त्यांच्यावर दोन कोटी रुपयांचे कर्ज सुद्धा आहे. त्यांच्याकडे वारसा हक्काने आलेली छत्रपती घराण्याची दौलत अमुल्य आहे. छत्रपती संभाजी महाराज हे वापरत असलेली हिऱ्याची अंगठी, शिवाय इतर सुवर्ण आभूषणे, साक्षात छत्रपती शिवाजी महाराज हे वापरत असलेले सुवर्ण अलंकार त्यांच्याकडे आहेत आणि त्याची बाजारभावाने सुद्धा किंमत करता येत नाही. एक प्रकारे छत्रपती घराण्याचा अमूल्य खजिनाच त्यांच्याकडे आहे.

कोल्हापूरच्या राजघराण्याचे श्रीमंत शाहू छत्रपती हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्याकडे एकूण 297 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जंगम संपत्ती 147 कोटी स्थावर मालमत्ता 49 कोटी सुवर्ण अलंकार दोन कोटी रुपये वाहने सहा कोटी रुपये अशी धनसंपदा आहे. त्यांच्याकडे असलेल्या काही सुवर्ण अलंकारांची बाजारभावाप्रमाणे किंमत करता येत नाही इतकी ती अमूल्य आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही.

उमेदवारांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे….!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडे एकूण 152 कोटी रुपयांची संपत्ती आहे. इतकी प्रचंड संपत्ती असूनही त्यांचे स्वतःचे असे चार चाकी वाहन नाही. मात्र त्या कायमच चार चाकीतूनच प्रवास करतात ते वाहन कोणाच्या मालकीची आहे हे समजू शकत नाही. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्या सध्याच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी सुनेत्रा पवार यांच्याकडून 35 लाख रुपये तर पार्थ पवार यांच्याकडून वीस लाख रुपये असे एकूण 55 लाख रुपये कर्ज घेतले आहे.

सुनेत्रा पवार यांची एकूण संपत्ती 58 कोटी रुपयांची असून ती अजितदादा पवार यांच्या पेक्षा जास्त आहे. शशिकांत शिंदे यांची स्थावर मालमत्ता 61 कोटी रुपयांची आहे तर सोलापूरच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांची संपत्ती सहा कोटी रुपयांची आहे अमोल कोल्हे यांची संपत्ती 9 कोटी रुपयांची आहे तर सुनील तटकरे साडेआठ कोटी रुपयांचे मालक आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अर्थात शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक तसेच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांची ही संपत्ती तीस कोटीच्या आसपास आहे. एकूणच या उमेदवारांच्या कडे असलेली संपत्ती पाहता ते अति श्रीमंत या श्रेणीतील असल्याचे स्पष्ट होते. उर्वरित महाराष्ट्रातील उमेदवारांची संपत्ती सुद्धा अशाच प्रकारची आहे. आणि म्हणूनच लोकसभा निवडणूक केव्हा विधानसभा निवडणूक ही आता सामान्य कार्यकर्त्याची किंवा दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांची राहिलेली नाही. हे यावरून स्पष्ट होते.

हेही वाचा :

अभिनेत्रीचा अपघात; तुटली हाताची दोन हाडं, पतीने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

अभिनेत्रीचा अपघात; तुटली हाताची दोन हाडं, पतीने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

यंदाही संदीपचा जलवा, कोल्हापूर लोकसभेसाठी भरला तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज !