एमआयएमने शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा दिलेला आहे. या पाठिंब्यामुळे(problem) महायुतीवर कोणताही फरक पडणार नाही. जी मतं आम्हाला मिळणारच नव्हती त्या मतांचा आम्ही विचार करत नाही असे नियोजन मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी नमूद केले.
रविवारी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील(problem) यांनी पत्रकार परिषद घेत एमआयएम शाहू महाराज छत्रपती यांनी स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. यावेळी जलील यांनी जे नेते मंडळी समाजासाठी काम करतात त्यांना आम्ही पाठिंबा दिला आहे. ते उमेदवार काेणत्याही पक्षातील असाेत. आम्हांला
दरम्यान नियोजन मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर यांनी साम टीव्हीशी बाेलताना एमआयएमच्या निर्णयाचा महायुतीवर कोणताही फरक पडणार नाही असे स्पष्ट केले. ते म्हणाले जी मतं आम्हाला मिळणारच नव्हती त्या मतांचा आम्ही विचार करत नाही.
काही वर्षांपूर्वी कोल्हापुरात एमआयएमची शाखा काढण्याचा प्रयत्न झाला होता पण तो उलथवून लावण्यात आलेला आहे. एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना अडचणीचा ठरेल असेही राजेश क्षीरसागर यांनी नमूद केले.
हेही वाचा :
कोल्हापूरची निवडणूक सोशल मीडियावरही तापली
साखर सम्राटांच राजकारण आणि सा.रे. पाटलांचं बंड
उमेदवारी माघारीची चर्चा सुरु असतानाच सांगलीत विशाल पाटलांचा मोठा निर्णय!