सोशल मीडियावर (social media)आजवर अनेक प्रकारचे व्हिडिओज शेअर आणि व्हायरल झाले आहेत. इथे कधी धक्कादायक स्टंट्सचे व्हिडिओज व्हायरल होतात तर कधी थरारक अपघातांचे… बऱ्याचदा इथे काही विनोदी व्हिडिओज देखील शेअर केले जातात जे पाहून तुमचे हसू अनावर होईल.
सध्या मात्र सोशल मीडियावर(social media) एका थरारक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये इतके भीषण आहेत की पाहून कुणाच्याही अंगावर काटा येईल. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
घटनेविषयी बोलणे केले तर, ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात घडली. यावेळी दुकानदाराने मोबाईल चार्जवर लावला असता अचानक त्याचा स्फोट झाला. या स्फोट इतका मोठा होता की त्यात दुकानदाराच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली.
ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आणि आता याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडिओतील दृश्ये इतकी भयानक आहेत की ती पाहून तुम्ही हैराण व्हाल.
मिळालेल्या माहितीनुसार, बिजनौर जिल्ह्यातील अफजलगडमधील सावला गावात 10 जानेवारीला संध्याकाळी मोबाईल रिपेअरिंगच्या दुकानात ही घटना घडली. या स्फोटात दुकान मालक मोहसीन जखमी झाला. यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दुकानदार मोहसीन हा त्याच्या ग्राहकाचा मोबाईल दुरुस्त करण्यापूर्वी चार्ज करत असताना अचानक मोबाईलच्या बॅटरीमध्ये काहीतरी बिघाड होऊन ती फुटली, त्यामुळे मोठा स्फोट झाला. स्फोटामुळे बॅटरीचे तुकडे व इतर भाग दुकानदाराच्या चेहऱ्यावर व डोळ्यांवर आदळल्याने तो जखमी झाला. स्फोट एवढा मोठा होता की, दुकानातील संपूर्ण वातावरण भयावह झाले.
ही संपूर्ण घटना दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ती सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्फोटानंतर मोहसीन घाबरलेला दिसत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
Mobile की बैटरी ब्लास्ट होने का Live सीसीटीवी Viral Video, हादसे में दुकानदार घायल हो गया। मामला बिजनौर जिले के अफजलगढ़ क्षेत्र का है जहां मोबाईल रिपेयर की शॉप में मोबाइल की बैटरी ब्लास्ट होने से दुकानदार घायल हो गया, दुकानदार को आंख और हाथ में गंभीर चोटे आई, हादसे का Live… pic.twitter.com/lkASzqAUvk
— Mohd Imran Ansari (@MIAnsari1234) January 11, 2025
घटना व्हायरल होताच आता अनेकजण यातील थरारक दृश्ये पाहून हादरले. तसेच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या. या भीषण घटनेचा व्हिडिओ @MIAnsari1234 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.
हेही वाचा :
ठाकरे-फडणवीसांच्या भेटींवर एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल; म्हणाले, “सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने कधी पाहिले नाही!”
WhatsApp वरील स्पॅम कॉल्समुळे हैराण झालात? लगेच अॅपमध्ये करा ही महत्त्वाची सेटिंग
झाडावर सिंह आणि बिबट्याची थरारक चकमक! शेवट पाहून उडेल धक्का; Video Viral