मोदी सरकार भ्रष्टाचाऱ्यांची क्लिनिंग मशीन, शरद पवारांचा घणाघात

देशाची सत्ता पुन्हा मोदी यांच्या(Govt) हातात द्यायची नाही अशी मनःस्थिती सध्या जनतेत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना पक्षात घेऊन स्वच्छ करतात. मोदी यांचे सरकार भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करण्याचे क्लिनिंग मशीन झाले आहे, असा घणाघात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारवर केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती अप्पासो जगदाळे (Govt)व कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांच्यासह त्याच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या वेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, तालुक्यातील एका व्यक्तीला मी तिकीट दिले. निवडून आणले, आमदार केले, मंत्री केले.

ते समाजातील लोकांच्या विकासासाठी काही करेल असे वाटले होते. परंतु त्याने स्वतःचा विकास केला अशी टीका पवार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांचे नाव न घेता केली. झालेली चूक या विधानसभे वेळी दुरुस्त करण्याची संधी आली असल्याचे ते म्हणाले.

देशाचे पंतप्रधान माझे बोट धरून राजकारणात आलो म्हणतात यावर कसा विश्वास ठेवायचा? अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. अनेक आश्वासने त्यांनी दिली. परंतु त्याची पूर्तता त्यांनी केली नाही.

हेही वाचा :

X युझर्ससाठी मोठी बातमी! आता X वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार

‘जुन्या वादात अडकून पडू नका, भविष्याचा विचार करून निर्णय घ्या’; जयंत पाटलांचा काँग्रेसच्या विशाल पाटलांना सल्ला

वंचित बहुजन आघाडीचे अनेक प्रयोग सुरू; सांगलीच्या जागेवरून विश्वजीत कदम यांच्याकडून सूचक संकेत