पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 21 व्या शतकातील राजे आहेत. त्यांना संविधान, कॅबिनेट किंवा संसदेशी काही देणेघेणे नाही. त्यांच्या मागे तीन फायनान्सर आहेत, त्यांच्याकडे पूर्ण पॉवर(power) आहे.
अंगठा बहाद्दर राजा लोकांचे ऐकतो, पण मोदी कुणाचेच ऐकत नाहीत. त्यांचेच सर्व नेते म्हणत आहेत आरक्षण संपवून टाकू, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला. लखनौमध्ये राष्ट्रीय संविधान संमेलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.(power)
तुम्ही कधीच आरक्षण संपवू शकत नाही. संविधान, आरक्षण, लष्कर सगळय़ावर भाजपवाले हल्ला करत आहेत. त्यामुळे आता पुढे काय करायचे हा प्रश्न आहे. सर्वात आधी हिंदुस्थानातील सामाजिक सत्य काय आहे ते जनतेपुढे आणायचेय. कुणाला दुखवायचे नाही किंवा धमकवायचेही नाही, असे राहुल गांधी म्हणाले. जर देशाला सुपर पॉवर बनायचे असेल तर केवळ 10 टक्के लोकांच्या जिवावर बनवता येणार नाही.
त्यासाठी 90 टक्के लोकांना भागीदारी द्यायला हवी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. विविध संस्थांमध्ये आरएसएसच्या लोकांची भरती करणे, न विचारताच ‘अग्निवीर’ योजना लागू करणे, ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करणे… हे सर्व संविधानाशी छेडछाड सुरू आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
हेही वाचा :
कोल्हापूरात आचारसंहिता पथकाला चकवा देत जावळ, बारसं, वाढदिवसानिमित्त तांबड्या-पांढऱ्यावर ताव
सांगलीत विशाल पाटलांची ताकद वाढली; वंचित आघाडीकडून पाठिंबा जाहीर
हातकणंगले मतदारसंघांत मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर!