मोदी-शहांनी लोटांगणवीर निर्माण केलेत – उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या उत्तरार्धात मोदी-शहा नीतीवर अक्षरशः आसूड ओढला. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतमधील इंग्रजांच्या(english) वखारी लुटल्या. त्याचा राग मोदी-शहा शिवसेनेवर आणि महाराष्ट्रावर काढीत आहेत काय?’’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदी-शहांनी महाराष्ट्रात लोटांगणवीर निर्माण केले. स्वाभिमान व शौर्य मारून टाकले असा घणाघातही केला.
उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना सवाल केला, ‘‘अख्खी शिवसेना तुमच्या सोबत होती. तिला तुम्ही नकली शिवसेना म्हणताय? आणि नकली लोकांना मांडीवर घेऊन त्यांना बाळा जो जो रे करताय?’’(english)
मोदी यांनी म्हणे शिवसेनेविषयी गोड बोलणे सुरू केले. हा त्यांचा खोटेपणा आहे. आता त्यांच्या बरोबर कदापि जाणार नाही. मोदी यांनी महाराष्ट्राचा घात केलाय. त्यांच्याबरोबर हातमिळवणी कदापि शक्य नाही, असा विश्वास त्यांनी जनतेला दिला.

देशातील संविधान या लोकांनी धोक्यात आणले. आमची लढाई संविधान वाचविण्यासाठी आहे. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महाराष्ट्राच्या सुपुत्राने देशाला संविधान बहाल केले. भाजपला हे संविधान संपवायचे आहे. शिवसेना ते होऊ देणार नाही. खात्री बाळगा!
मुलाखतीच्या उत्तरार्धाची सुरुवात मोदी यांच्या सुडाच्या राजकारणावरून झाली!
महाराष्ट्र देशाला दिशा दाखवण्याचे काम करत आला आहे. यात गेल्या पन्नास वर्षांच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली आहे. ही भूमिका सूडबुद्धीने नष्ट करण्याचा प्रथमच प्रयत्न झाला, तोसुद्धा तुमचे मित्र नरेंद्र मोदी यांच्याकडून.


– पण त्यांच्या शंभर पिढ्या अवतरल्या तरी त्यांना ते शक्य होणार नाही.
नरेंद्र मोदी या देशावर दहा वर्षे राज्य करत आहेत. या दहा वर्षांना त्यांच्या अंधभक्तांनी आणि स्वतः मोदी यांनी ‘अमृतकाळ’ असे नाव दिले. खरोखर हा ‘अमृतकाळ’ होता? कारण शिवसेनेसाठी हा विषाचा प्याला होता, असे मी मानतो…
– विषाचा प्याला केवळ शिवसेनेसाठीच नाही. देशासाठीही आहे आणि त्यांचा शिवसेनेवर हा राग का आहे? …अगदी इतिहासात मागे जाऊन पाहिलं तरी छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा सुरत लुटली होती. कारण तिथले काही व्यापारी इंग्रजांना मदत करत होते. त्यांच्या वखारी महाराजांनी लुटल्या होत्या. कदाचित तिथपासूनचा हा राग या दोघांच्या मनात आहे का? संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला, त्या लढ्यात माझे आजोबा प्रबोधनकार हे त्या पहिल्या पाच महत्त्वाच्या नेत्यांमधले एक होते.

हेही वाचा :

रेल्वे प्रवाशांना विषबाधा, यशवंत-गोरखपूर एक्स्प्रेसमधील प्रकार; नेमकं काय घडलं?

घ्या हाती मशाल… देशाची वाट लावणाऱ्यांना, महाराष्ट्रातून रोजगार पळवणाऱ

विज्ञान-रंजन – सुएझ कालवा