तुम्ही नोटबंदीत आईला (mother)रांगेत उभे केले. नक्वदीच्या घरात गेलेल्या मातेला स्वार्थासाठी वापरलेत, तसा मी निर्दयी नाही. आमचे हिंदुत्व पितृदेवो भव, मातृदेवो भव असे आहे.
बाळासाहेबांची नकली संतान, अशी बेताल बडबड करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले. हा माझा नाही तर माझ्या देवतासमान माँसाहेबांचा आणि शिवसेनाप्रमुखांचा अपमान आहे. तुम्ही माझ्याशी लढा पण माझ्या मातापित्यांचा अपमान केला तर मी सहन करणार नाही. तुम्ही कोणीही असाल तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.(mother)
मोदीजी, तुमच्यावर आईवडिलांचे संस्कार कदाचित झाले नसतील, पण मी सुसंस्कृत घराण्यातील आहे. घराणेशाहीचे वावडे तुम्हाला असेल, पण मला अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे नाव सांगायला लाज वाटत असेल. तुम्ही नोटबंदीत आईला रांगेत उभे केले. नक्वदीच्या घरातील मातेला तुम्ही स्वार्थासाठी वापरलेत तसा मी निर्दयी नाही. आमचे हिंदुत्व पितृदेवो भव, मातृदेवो भव असे आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर हल्ला चढवला. मला नकली संतान म्हणता, अरे तुम्हीच नकली आहात, बेअकली आहात, अशी चपराक उद्धव ठाकरे यांनी लगावली.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचारार्थ श्रीरामपूर येथे जाहीर सभा झाली. त्या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या टीकेचा अस्सल ठाकरी भाषेत समाचार घेतला.
पश्चिम हिंदुस्थानातील लोक अरबांसारखे दिसतात असे वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केले होते. ते महाराष्ट्राला मान्य आहे का, असा सवाल तेलंगणा येथील सभेमध्ये करताना पंतप्रधान मोदी यांनी उद्धव ठाकरे यांचा नकली संतान असा उल्लेख केला होता. त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी, माझ्याशी लढा, पण माझ्या आईवडिलांचा अपमान केलात तर सहन करणार नाही, असे ठणकावून सांगितले. मोदीजींबद्दल मला आदर होता असे आता म्हणावे लागेल, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. मोदींना सर्वत्र उद्धव ठाकरे दिसताहेत. अहो, मी महाराष्ट्रात तुमच्याविरुद्ध उभा आहे, पण त्यांना काय झालेय कुणास ठाऊक? असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अरे नकली माणसा, पंतप्रधान पदासाठी माझी सही घ्यायला लाज नाही वाटली?
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पूर्व इतिहास सांगत पंतप्रधान मोदींचा अचूक वेध घेतला. आज नकली संतान म्हणताय, पण नकली माणसा, 2014 मध्ये राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडे जाताना तुम्ही माझीच सही घेतली होती. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार मोदी असतील म्हणून. त्यावेळी सही घेताना लाज नाही वाटली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
मोदींचा बोगसपणा खतम करून टाकायचाय
2014 च्या विधानसभा निवडणुकीत चंपा म्हणजे चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार पाडा असे आदेश दिले होते असा गौप्यस्पह्ट कोल्हापुरातील एका माजी नगरसेवकाने नुकताच केला. असले पाप शिवसेनेने कधी केले नाही. शिवसेनेने मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी निष्ठsने काम केले होते, पण भाजपने पाठीत वार केला. वाजपेयी सरकारच्या काळात गुजरात दंगलीवरून ज्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वाचवले त्यांच्याच मुलाला आता मोदी नकली संतान म्हणताहेत. हा बोगसपणा भाकडपणा शिवसेनेला खतम करून टाकायचाय, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
हुकूमशाहीविरुद्ध एकही मत नासता कामा नये
भाजप काय करते, प्रत्येक ठिकाणी एक डायरेक्ट उमेदवार, एक गद्दार उमेदवार आणि तिसरा भाजपविरोधातील मते पह्डणारा छुपा उमेदवार उभा करते आणि तिरंगी लढाई आहे असे चित्र उभे करते. पण शिर्डीत तिरंगी नाही तर तिरंग्यासाठी लढाई आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच शिवसेनेच्या जयघोषाने सभास्थळ दुमदुमले. आपल्या विरोधातील मते नासवायची कशी हे भाजपला चांगले समजते. ही लढाई तिरंग्यासाठी आहे. लोकशाही संपवायला निघाले आहेत. त्यामुळे हुकूमशाहीविरुद्धचे एकही मत नासता कामा नये, मशाल म्हणजे मशालीलाच मिळाले पाहिजे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
हेही वाचा :
लोकसभा निवडणूक प्रचारात “व्यवस्थे”वरच संशय व्यक्त
एक, दोन नाही तर चार वेळा धडपडली काजोल Video Viral
हातकणंगले मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंची ऑफर काय होती अन्… ? राजू शेट्टी