मोदींचे ध्यान म्हणजे आचारसंहितेचे उल्लंघन!

देशातील सार्वत्रिक निवडणुकांचा प्रचार उद्या समाप्त होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी(modi) यांनी 30 मेपासून कन्याकुमारीत स्वामी विवेकानंद स्मारकात 48 तासांचे ध्यान करण्याचे नवे नाटक जाहीर केले आहे. प्रचार समाप्तीनंतरच्या शांतता कालावधीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रचार करण्यास मनाई असताना ध्यान करण्याची मोदींची ही घोषणा म्हणजे शांतता काळाला बगल देत निवडणूक आचारसंहितेचे थेट उल्लंघन असल्याची तक्रार आज काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली. मोदींचे हे नाटक माध्यमांद्वारे प्रसारित होणार नाही याची आयोगाने दक्षता घ्यावी, अशी मागणीही काँग्रेसच्या शिष्टमंडळाने केली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही मोदींच्या या नव्या नाटकावर सडकून टीका केली आहे.

प्रचार समाप्त झाल्यावर गुरुवारी संध्याकाळपासून 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत विवेकानंद स्मारकात मौन धारण करून ध्यानाला बसणार असल्याचे मोदींनी जाहीर केले आहे. त्यांच्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त येथे दोन दिवस तैनात असणार आहे. काँग्रेस, तृणमूलसह सर्वच विरोधी पक्षांनी या घोषणेला आक्षेप घेतला आहे. आज काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला, अॅड. अभिषेक सिंघवी, सय्यद नसीर हुसेन यांच्यासह काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि भाजप व मोदींनी केलेल्या कथित आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे आयोगाचे लक्ष वेधले.(modi)
काँग्रेसने मोदींच्या घोषणेविरोधात मुख्य निवडणूक आयुक्तांना सविस्तर निवेदन दिले असल्याचे या भेटीनंतर अॅड. सिंघवी यांनी सांगितले. या निवेदनातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

प्रचार समाप्तीनंतरच्या शांतता कालावधीत कोणताही नेता प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे प्रचार करू शकत नाही.
उद्या संध्याकाळपासून शांतता कालावधी सुरू होत असताना, पंतप्रधानांनी 30 मेच्या संध्याकाळपासून मौन ध्यान करण्याची केलेली घोषणा हे सरळसरळ आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे.
भाजपच्या सोशल मीडिया हँडलवरून चालवल्या जाणाऱया असभ्य आणि आक्षेपार्ह जाहिरातींबद्दलही काँग्रेसने तक्रार केली आहे.
राहुल गांधींचे बनावट व्हिडीओ पसरवले जात असल्याबाबतही काँग्रेसने तक्रार केली आहे. निवडणूक आयोगाला हिमंता बिस्वा सरमा यांच्या विधानावर कारवाई करण्याची विनंतीही काँग्रेसने केली आहे.

ध्यान करण्यासाठी कॅमेरे कशाला हवेत?

देव कधी ध्यान करतो का, देवाचे ध्यान सर्वजण करतात.. तरीही मोदींना ध्यान करायचे असल्यास त्यांनी खुशाल करावे, पण मोदी यांचे ध्यान टीव्हीवर प्रसारित झाल्यास आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. कारण आचारसंहितेला बगल देऊन अप्रत्यक्ष प्रचार करण्याचाच हा प्रयत्न आहे, असे जोरदार टीकास्त्र तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही आज मोदींवर सोडले आणि ध्यान करण्यासाठी मोदींना क@मेरे कशाला सोबत हवेत? या प्रकारे ते आचारसंहितेचे उल्लंघनच करत आहेत, असा दावा त्यांनी केला. आम्ही मोदींचे मंदिर बांधू आणि त्यांना ढोकळा अर्पण करू, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.

हेही वाचा :

दहावीचा आज निकाल! विद्यार्थ्यांना ‘या’ संकेतस्थळावरून पाहाता येणार निकाल

ताडोबात पर्यटकांनी वाघाला घेरले! सरकारी यंत्रणा हादरली, वन्यप्रेमी चिंतेत

30 वर्षांनंतर इतिहास रचला, कान्समध्ये ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाईट’ला