भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. 2018 मध्ये तिने मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंग आणि घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता(bedroom). तसंच मोहम्मद शमीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप करुन खळबळ उडवून दिली होती.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/11/image-392-1024x819.png)
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरही तिने आपले आरोप कायम ठेवले होते. त्यातच आता हसीन जहाँचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तिने बेडरुममध्ये(bedroom) शूट केला असून नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
व्हायरल व्हिडीओत हसीन जहाँने सफेद रंगाचे कपडे घातलेले दिसत आहे. यावेळी ती ऐश्वर्या रायच्या ‘कजरारे’ या गाण्यावर रील शूट करत असल्याचं दिसत आहे. सुरुवातीला ती खुर्चीवर जाऊन बसते. नंतर सोफ्यावर जाऊन झोपते, त्यानंतर बेडवर जाऊन झोपताना दिसत आहे. हा व्हिडीओ स्वत: हसीन जहाँने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओवरुन तिला ट्रोल केलं जात आहे.
हसीन जहाँचा हा व्हिडिओ पाहून चाहते शमीच्या घटस्फोटाच्या निर्णयाला योग्य ठरवत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, ‘मोहम्मद शमी आयुष्यात नेहमीच योग्य निर्णय घेतो. लव्ह यू शमी भाई’. दुसऱ्याने लिहिले- ‘शमी भाईचा निर्णय अगदी योग्य होता.’
एका युजरने लिहिलं, ‘या कृतींमुळे शमी भाई तुला सोडून गेले’. तर एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की, ‘ ही कसली महिला आहे, यार. मोहम्मद शमीने तिच्याशी लग्न करून आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली’.
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/4_53.jpg)
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचं 2014 साली लग्न झालं होतं. लग्नानंतर अवघ्या चार वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगीही आहे. कोलकाता न्यायालयाने शमीला जानेवारी 2023 पर्यंत हसीन जहाँला दरमहा 1.30 लाख रुपये पोटगी देण्याचे आदेश दिले होते. यामध्ये तिच्या पालनपोषणासाठी 50 हजार रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी 80 हजार रुपये देण्याचे आदेश देण्यात आले होते.
हेही वाचा :
आधारकार्ड संदर्भात महत्वाची माहिती; नागरिकांना होणार फायदाच फायदा
फडणवीसांना मुख्यमंत्री करणं भाजपला पडणार भारी?, ‘या’ 3 गोष्टींनी चिंता वाढवली
अभिनेता अक्षय आठरेचा सोशल मीडिया स्टार ते अभिनेता हा प्रवास आहे खास, युवकांसाठी तो ठरतोय आयडॉल