कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : टाटा च्या सामाजिक विज्ञान शाखेने मुंबईच्या लोकसंख्याविषयक केलेल्या संशोधनाचा अहवाल नुकताच जाहीर केला असून तो मुंबईच्या पायाभूत सुविधा, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रासाठी नक्कीच चिंता(most corrupt nations) वाढवणारा आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा अहवाल प्रकाशित झाला असला तरी त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. अहवालाचे प्रसिद्धीकरण आणि विधानसभा निवडणुका हा योगायोग आहे.
गेल्या काही वर्षात वर्षात मुंबईतील हिंदूंची संख्या घटली असून मुस्लिमांची संख्या मात्र जाणवण्या इतकी वाढली असल्याचे टाटा च्या अहवालात म्हटले आहे. शेजारच्या राष्ट्रातून भारतात येऊन मुंबईत घुसलेल्या मुस्लिमांना इथले अधिकृत नागरिक बनवण्यात इथली भ्रष्ट(most corrupt nations) यंत्रणा कारणभूत आहे. “तुम्ही जिवंत असल्याचा दाखला सादर करा, असे समोरच्या जिवंत माणसाला सांगणाऱ्या व्यवस्थेने घुसखोरांबद्दल साधा संशय व्यक्त केलेला नाही.
जगातील अनेक प्रगत देशांना घुसखोरांची समस्या आहे. अमेरिकेत शेजारच्या लॅटिन अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर घुसखोर आलेले आहेत आणि येत आहेत. या घुसखोराना शोधून काढून त्यांना त्यांच्या देशात पाठवण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम विद्यमान डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने आखला आहे. येत्या दहा वर्षात अमेरिकेतील सर्वच घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने 68 अब्ज रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. अमेरिकेच्या तुलनेत भारताने असा कोणताही प्रभावी कार्यक्रम आखलेला नाही. सुधारित नागरिकत्व कायदा हा त्याचाच एक भाग असला तरी देशभर पसरलेल्या घुसखोरांना त्यांच्या देशात पाठवण्याचे कोणतेही नियोजन विद्यमान सरकारने केलेले नाही.
मुंबईत 1961 मध्ये हिंदूंची संख्या 88% होती. आणि मुस्लिमांची संख्या केवळ आठ टक्के होती. आता 2051पर्यंत हिंदूंची मुंबईतील संख्या 54 टक्क्यापर्यंत खाली येणार असून मुस्लिमांची संख्या 30 टक्क्यांवर जाऊन पोहोचणार आहे. शेजारच्या बांगला आणि म्यानमार या देशातून मोठ्या प्रमाणावर मुस्लिम आणि रोहिंगे मुस्लिम प्रथम भारतात आले आणि नंतर तेथून देशभर विशेषतः मुंबईत पसरले. मुंबईत गोवंडी, मानखुर्द, मुंब्रा, भिवंडी, नया नगर येथील झोपडपट्ट्यांमध्ये हे घुसखोर राहत असल्याचे टाटाच्या अहवालात म्हटले आहे.
घुसखोरांच्याकडून भरपूर पैसे घेऊन दलालांनी, शासनातील भ्रष्ट(most corrupt nations) कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हेरून घुसखोरांना शिधापत्रिका, आधार कार्ड, मिळवून दिले आहे आणि त्याचाच आधार घेऊन या घुसखोरांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घेऊन आम्ही या देशाचे नागरिक आहोत हे पुराव्यासह सिद्ध केले आहे. हे केवळ भ्रष्ट साखळीच्या माध्यमातून घडलेले आहे.
कोल्हापूर शहराच्या उपनगरात तीन-चार महिन्यापूर्वी बांगलादेशच्या नागरिक असलेल्या दोन महिलांना स्थानिक पोलिसांनी पकडले होते. कोल्हापुरात बांगलादेशातून आलेले अनेक सुवर्ण कारागीर आहेत आणि आता ते रीतसर भारतीय नागरिक बनलेले आहेत. त्यांनी पैशाच्या जोरावर शिधापत्रिका मिळवली आहे, मतदार यादीत आपले नाव घातलेले आहे, आता तर त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅन कार्डही आहे. त्यामुळे ते बांगलादेशी आहेत असा दावा कोणालाही करता येत नाही. कोल्हापुरात बंगाली कारागिरांनी संघटना स्थापन केली असून त्यामध्ये पूर्वाश्रमीचे बांगलादेशी कारागीर सुद्धा आहेत.
टाटा च्या सामाजिक विज्ञान संस्थेने मुंबईच्या लोकसंख्याविषयक केलेल्या संशोधनातून जे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत ते चिंता वाटावी असे आहेत. अजून 25 वर्षानंतर मुंबईतील हिंदूंची संख्या 54 टक्क्यावर येणार आहे. 1961 मध्ये हिंदूंची संख्या 88% होती इसवी सन 2011 मध्ये ते 66% वर आली आणि आता ती आणखी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याचे संकेत या अहवालाने दिले आहेत.
मुंबईतील मराठी माणसाचा टक्का फारच घसरला आहे. मूळचे मुंबईचे मराठी लोक गेल्या काही वर्षात मुंबईच्या बाहेर फेकले गेले आहेत. आणि आता मराठी माणसा शिवाय इतरही हिंदू धर्मीय मुंबईतून कमी होत असताना दिसत आहेत. हिंदूंची संख्या कमी होणे आणि मुस्लिमांची संख्या वाढणे हे भविष्यात मुंबईतील कायदा व सुव्यवस्था विषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
हेही वाचा :
नववधुप्रमाणे सजवा तुळशी वृंदावन, साजश्रृंगारासाठी अशी करा तयारी
‘त्या’ फाईलचं नेमकं प्रकरण काय? …म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर केस करणार सुप्रिया सुळे
‘…तर बाय रोड जाऊन दाखव!’; उद्धव ठाकरेंनी कोकणात पाऊल ठेवण्याआधीच नारायण राणेंचा इशारा