आईचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असते. ती कधीच आपल्या मुलांना त्रास झालेला पाहू शकत नाही. पण, जेव्हा एका आईला आपल्याच मुलाचा (death)मृत्यू पाहावा लागतो, त्यापेक्षा वेदनादायी या जगात काही नाही असं म्हणतात.
हे दु:ख पचवणं जवळपास अशक्य असतं. असंच काहीसं छत्रपती संभाजीनगर येथे घडलं आहे. जिथे आपल्या मुलाच्या निधनाचा (death)आईने इतका धसका घेतला की काहीच तासात तिने आपलेही प्राण त्यागले.
छत्रपती संभाजीनगर येथे एका ४७ वर्षीय व्यक्तीचं अल्पशा आजाराने निधन झालं. या घटनेची माहिती त्या व्यक्तीच्या आईला मिळताच आईनेही नऊ तासात आपले प्राण सोडले.
ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील तिडका या गावात घडल्याची माहिती आहे. अवघ्या नऊ तासाच्या अंतराने माय लेकांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने गावात एकच शोककळा पसरली आहे. सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पांडुरंग नामदेव गवळी (वय ४७), निर्मलाबाई नामदेव गवळी (वय ७० वर्ष रा. ता. सोयगाव तिडका) असे मृत मायलेकांचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग गवळी यांची अल्पशा आजाराने प्रकृती खालावली.
दरम्यान शनिवार दिनांक ११ जानेवारीला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पांडुरंग गवळी यांचं निधन झालं. ही बाब त्यांची आई निर्मला गवळी यांना कळाली. मुलाचं निधन झाल्याची बातमी ऐकताच त्यांना धक्का बसला. यामुळे त्यांची प्रकृती खालावली.
पांडुरंग नामदेव गवळी (वय ४७), निर्मलाबाई नामदेव गवळी (वय ७० वर्ष रा. ता. सोयगाव तिडका) असे मृत मायलेकांचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पांडुरंग गवळी यांची अल्पशा आजाराने प्रकृती खालावली. दरम्यान शनिवार दिनांक ११ जानेवारीला सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पांडुरंग गवळी यांचं निधन झालं. ही बाब त्यांची आई निर्मला गवळी यांना कळाली. मुलाचं निधन झाल्याची बातमी ऐकताच त्यांना धक्का बसला. यामुळे त्यांची प्रकृती खालावली.
हेही वाचा :
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
आरारारा खतरनाक! हळदीत काकांनी धरला जबरदस्त ठेका; बघून तुमचेही पाय लागतील थिरकायला, Video Viral
‘न्याय देणारी व्यवस्था आरोपीला वाचवतेय’; रोहित पवारांची सरकारवर तीव्र टीका