रील बनवताना आईचे मुलीकडे दुर्लक्ष झाले अन् चिमुकली रस्त्यावर…VIDEO 

सोशल मीडियावर आपल्याला दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी डान्स, कधी भांडणांचे, लग्नासंबंधित, जुगाड, स्टंट आणि इतरही असे अनेक व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या लोकांना रिल बनवण्याची क्रेझ लागली आहे. जिकडे नजर जाईल तिकडे लोक रिल बनवताना दिसतात. कोणी डान्स करत असते, तर कोणी स्टंट तर कोणी आणखी काही क्रिएटीव्ह कंटेट बनवत असते.

पण अनेकदा या व्हिडिओ बनवण्यामध्ये लोकां धोकादायक अशा गोष्टी देखील करतात. कोणी रस्त्याच्या मधोमध जाउ स्टंट करत असते. तर कोणी असे स्टंट करताता की यामुळे त्यांना एकतर जीव गमवावा लागतो किंवा गंभीर दुखापत होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ(VIDEO) सोशल मीडियावर चर्चेचा बनला असून व्हिडिओत एक आई रील बनवत असते. त्याच वेळी तिची मुलगी असे काही करते की तुमचा काळजाचा ठोका चुकले.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक आई रस्त्याच्या कडेला उभी राहून रिल बनवत आहे. तिच्या आसपास तिची दोन मुले खेळत आहेत. हा व्हिडिओ पाहून असे वाटते की हे कुटूंब कदाचित मनाली किंवा आणखी एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेले असेल. त्याच वेळी आई रिल बनवत असताना तिचा मुलगा तिच्या आसपास खेळत असतो तो तिथे येतो.

तो त्याच्या आईला त्याची बहिण रस्त्यावर पळत सुटल्याचे दाखवतो. हे पाहताच आई देखील मुलीच्या मागे फोन सोडून धावत जाते आणि मुलील सुरक्षित बाजूला घेते. सुदैवाने त्यावेळी कोणतीही गाडी तिथून जात नसते आणि आईने मुलीला लवकर बाजूला केले यामुळे कोणती दुखद घटना घडत नाही.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @jitu_rajoriya या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. तसेच काहींनी संतापजनक प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, एवढी काय रिल बनवायची हौस की मुलांकडे दुर्लक्ष होईल, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, बारकी पोरं सुसाट धावत पळतात इकडे तिकडे अजीबात बघत नाहीत. आणखी एकाने म्हटले आहे की, बाहेर फिरायला जायचे तर मुलांना कशाला घेऊन जायचे.

हेही वाचा :

अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप, आता मलायका पुन्हा प्रेमात? ‘या’ कुल बॉयसोबतचा फोटो समोर

BEST बसचालक दारू पिल्याचा आरोप; शिवसेना आमदाराने सांगितलं खरे सत्य, म्हणाले ‘घाबरून त्याने…’

व्हॉट्सॲपचे आश्चर्यकारक फिचर! आता कोणीही ऐकू नाही शकणार तुमचा Voice Message