आईने ३ वर्षीय चिमुकलीला संपवले, मृतदेह सूटकेसमध्ये लपवण्याचा प्रयत्न

बिहारमध्ये एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण समाजाला (society)हादरवून सोडले आहे. एका महिलेने आपल्या ३ वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह सूटकेसमध्ये लपवण्याचा प्रयत्न केला. या निर्घृण कृत्यामागचे कारण समजल्यावर कुटुंबीय आणि पोलिसही चक्रावून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचे दुसऱ्या एका पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. तिच्या या नात्यात तिची मुलगी अडथळा ठरत असल्याने तिने हे भयंकर कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या घटनेने पुन्हा एकदा समाजातील मूल्यांचा ऱ्हास आणि मानवी संवेदनांची कमतरता अधोरेखित केली आहे.

हेही वाचा:

एक पुतळा कोसळताना काही प्रश्न उभे राहतात!

”त्याने मागून पकडलं, किस केलं”; सिनियर अभिनेत्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

दहीहंडीची सुपारी घेतली, साऊंडचं टेस्टिंग जीवावर बेतलं; दोन जण रात्रभर वीजेच्या तारेला चिटकले