महिलेचे बाजूच्या गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध होते. तिच्या नवऱ्याला(husband) याची माहिती कळताच त्याने याचा विरोध केला. मात्र, नवऱ्याच्या विरोधाला न जुमानता तिने प्रियकरासोबतच संबंध तोडलेच नाहीत. पतीने विवाहितेला अनेकदा प्रियकरासोबतचे नाते तोडण्यास सांगितले. मात्र, पतीच्या विरोधानंतर महिला सतत आत्महत्या करण्याच्या धमक्या द्यायला लागली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशच्या गोरखपुर जिल्ह्यातून ही खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे, महिलेचे(husband) अनैतिक संबंध समोर येताच तिने वीजेच्या खांबावर चढत जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेला तीन मुलं आहेत. तसंच, गेल्या सात वर्षांपासून तिचे अफेअर सुरू आहे. पतीला तिच्या संबंधांबाबत कळताच त्याने विरोध सुरू केला. त्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याची धमकी दिली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या गावातील एका तरुणासोबत तिचे अफेअर होते. पतीने तिच्या या संबंधांना विरोध केल्यानंतर तिने कित्येकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. एक महिन्यांपूर्वी तिने एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याआधीही आत्महत्या करण्यासाठी ती रेल्वे रूळांवर पोहोचली होती. या घटनांनंतर तिने पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला विजेच्या खांबावर उभी असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. स्थानिक तिला समजावून खाली उतरण्याची विनंती करत आहेत. तर, पोलिसही पती-पत्नी आणि तिच्या प्रियकरासोबत मिळून या घटनेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितले की, पत्नीच्या प्रियकराला तिच्यासोबतच राहायचे आहे. मात्र आम्हाला तीन मुलं आहेत आणि कौटुंबिक कारणांमुळं मी तिला सोडू शकत नाही. पण मला त्यांचे संबंधही मान्य नाहीत.
तीन मुलांची आई असूनही तिचे एका युवकावर प्रेम बसले. त्यानंतर तिने पतीलाच तिच्या प्रियकरालाही घरातच राहू देण्याची मागणी केली. मात्र पतीने याला विरोध केला. पतीने विरोध करताच नाराज झालेल्या महिलेने विजेच्या खांबावर चढून जीव देण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
महिला वीजेच्या खांबावर चढल्याची माहिती मिळताच पोलिस आणि वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत महिलेला वीजेच्या खांबावरुन उतरवले आहे. सध्या महिला सुरक्षित आहे. मात्र, या घटनेची गावात एकच चर्चा आहे.
हेही वाचा :
कालचा गोंधळ बरा होता! सामान्य माणसाची प्रतिक्रिया
नारायण राणेंचा पराभव केला, तर श्रीकांत शिंदे अजूनही ‘बच्चा’; संजय राऊत यांचा हल्लाबोल
कोल्हापुरात सामायिक शेतीच्या वादातून अल्पवयीन पुतण्याने केला काकाचा गेम