बॉलीवूडवर शोककळा! ‘गदर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याने घेतला जगाचा निरोप

‘कोई मिल गया’ आणि ‘गदर’ यांसारख्या हिट चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते(actor) टोनी मिरचंदानी यांचे निधन झाले आहे. ते दिर्घकाळ आजाराने त्रस्त होते. अखेर काल 4 नोव्हेंबररोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. या बातमीमुळे बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

टोनी मिरचंदानी यांनी साकारलेल्या भूमिका आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. त्यांनी आपल्या अभिनयाने(actor) प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडला आहे. ‘कोई मिल गया’ आणि ‘गदर’या चित्रपटातील भूमिकांमुळे त्यांना अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यांनी अनेक चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारली आहे.

अशात त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे. टोनी मीरचंदानी यांच्या पश्चात पत्नी रमा मीरचंदानी आणि मुलगी श्लोका मीरचंदानी असा परिवार आहे. दिवंगत टोनी मिरचंदानी यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

टोनी मिरचंदानी यांनी चित्रपटांसोबतच अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. ‘गदर’ चित्रपटामधूनही त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल छाप पाडली. टीव्ही जगतातही ते लोकप्रिय अभिनेते होते. त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

प्रसिद्ध अभिनेत्रीची पर्स आणि सोनसाखळी चोरीला

हार्दिक, बुमराहसह 6 जण कायम? रिटेन्शन यादीत एक अनपेक्षित नाव

धक्कादायक! कर्ज देत नसल्याच्या कारणावरुन बँक मॅनेजरवर कोयत्यानं हल्ला