मुंबई : राज्यामध्ये सध्या धर्मवीर 2 चित्रपटाची(movie) चर्चा आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांच्यामधील अनेक क्षण या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे. यापूर्वी धर्मवीर चित्रपटाने प्रेक्षकांवर जादू केली होती.
धर्मवीर चित्रपटाने(movie) चित्रपटगृहामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता धर्मवीर 2 चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला असून आता धर्मवीर 3 चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चित्रपटावर निशाणा साधला आहे. या सिनेमातील एका सीनवर संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर चित्रपटावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीवर निशाणा साधला आहे. खासदार राऊत म्हणाले की, “बघा धर्मवीर एक आला, आता धर्मवीर दोन, धर्मवीर तीन. जसजसे निवडणूक आहेत तसेच धर्मवीर एक, दोन, तीन, चार, पाच धर्मवीर चित्रपट येतील. पण आनंद दिघे यांना आम्ही जास्त ओळखतो.
दिघे साहेबांचे निधन 2001 साली झाले, राज ठाकरे यांनी पक्ष 2005 साली सोडला. ज्यांनी पक्ष सोडला 2005 ला त्यांच्याबाबत 2001 साली स्वर्गवासी झालेले आनंद दिघे बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे, काल्पनिक गोष्टींवर याच्यावर विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिघे साहेबांचे चारित्र्यहनन केलं आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे खासदार संजय राऊत म्हणाले, “सिनेमा(movie) लावला होता टीव्हीला मी कुठेतरी होतो आणि मला दिसलं मला धक्का बसला. ज्या गोष्टीला मी साक्षीदार आहे आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या त्यांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. खांद्यावर पार्थिव घेऊन शिंदे पळत आहेत कोण बनवत आहे ? कोण लिहीत आहे? हा आनंद दिघे यांचा अपमान आहे आणि त्यांचे समर्थक यांचा देखील अपमान आहे अशा गोष्टी त्याच्यात दाखवल्या आहेत.या सिनेमाला एक डुब्लीकेट ऑस्कर लावून टाका. आनंद दिघे यांची डेड बॉडी घेऊन मुख्यमंत्री पळत आहेत आणि आनंद दिघे यांचे हात असे लटकत आहेत काय आहे हे ?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पुढे या सीनवरुन रोष व्यक्त करत संजय राऊत म्हणाले की, “हे पैशाच्या लालचमध्ये रायटर, डायरेक्टर, कलाकार आणि पिक्चर बनवत आहेत. हा आनंद दिघे यांचा सर्वात मोठा अपमान आहे. पण ज्या पद्धतीने आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर जो वापर केला जात आहे अशा पद्धतीने हा घृणास्पद, हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. हा प्रचार पण नाही आहे हा दिघे यांचा अपप्रचार आहे. असा बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही.
आनंद दिघे यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे, त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे, अनेक खटल्यात मी त्यांच्यासोबत साक्षीदार आहे. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला तिकडे आम्ही उपस्थित होतो. कोणी तिकीट काढून जाणार नाही सर्व खोटं आहे. चित्रपटाच्या सुरुवातील त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे या सिनेमातील कथाकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही, कारण हे सत्यच नाही,” असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी धर्मवीर 2 चित्रपटावरुन केला आहे.
हेही वाचा:
आवाडे पिता-पुत्रांच्या हातात आता “कमळ”!
विराटची एक झलक पाहण्यासाठी 15 वर्षांच्या मुलाने केलं असं काही
कोल्हापूर उत्तरमधून लढण्यास तयार, कृष्णराज महाडिकांनी शड्डू ठोकला