मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्षवेधीस दिलेल्या (scheme)उत्तरानुसार अधिवेशन समाप्तीपुर्वी सुळकुड योजनेसाठी बैठक लागण्याची शक्यता आहे,या बैठकीत आमदार राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने यांनी प्रखर व ठोस भूमिका मांडावी अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचद्वारे पत्रकार परिषदेत करण्यात आली. इचलकरंजी शहरासाठी सुळकुड उद्भव धरून दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजना मंजूर आहे सदर योजनेसाठी १६० कोटीचे बजेट ही नोव्हेंबर २०२२ मध्ये लागले असून काम निविदा प्रक्रियेत असताना नदीकाठच्या गावांनी विरोध केल्याने योजना जिल्हाधिकारी नहोदयांनी दोन्ही बाजूचे अहवाल घेऊन शासन स्तरावर मार्ग काढण्याबाबत आश्वासन दिले होते.

व्यानुसार दोन्ही बाजूच्या तक्रारीचा विचार करून महाराष्ट्र शासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाने २१-२-२०२४ रोजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अहवाल पाठवला.त्या अहवालाच्या अनुषंगाने १ मार्च २०२४ रोजी विधान भवनामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लागून दोन्ही बाजूच्या म्हणण्याचा विचार करत एक महिन्यात अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले होते.मुळात एकदा अहवाल तयार असताना परत अहवाल देण्याची गरज नव्हती परंतु मुख्यमंत्री महोदयांचा आदर ठेवून इचलकरंजीकरांनी ती भूमिका स्वीकारली त्यानंतर १२ मार्च रोजी प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
त्यानंतर लोकसभा निवडणूकित काही काळ गेला व जिल्हाधिकारी महोदयांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे खाते यांचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागाचे अधिकारी (scheme)यांच्यासहित दूधगंगा बचाव कृती समिती व सुळकुड पाणीयोजना कृती समिती या दोन्ही समितीचे प्रत्येकी एक सदस्य यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन विविध मुद्द्याची चर्चा करत अहवाल शासनाकडे पाठवला. सदर अहवाल एक महिन्यात जाणे अपेक्षित होते परंतु आज एक वर्षे झाली तरी याबाबत बैठक लागली नाही.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे माननीय आमदार, खासदार महोदय यांनी इचलकरंजी शहराला सुळकुड योजनेतून पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे या आश्वासनानुसार १९ डिसेंबर रोजी विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये आ. राहुल आवाडे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत या योजनेकडे शासनाचे लक्ष वेधले.त्यानंतर नुकतीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आ.राहुल आवाडे यांनी लक्षवेधी उपस्थित करत या योजनेचा परत पाठपुरावा केला. खासदारानीही पत्राद्वारे मुख्यमंत्री तसेच जलसंपदा मंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला.त्यादरम्यानच्या कालावधीमध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आलेले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा मुद्दा चर्चेला गेला त्यावेळी दोन्ही लोकप्रतिनिधींनी याबाबत आपले म्हणणे मांडले त्यावेळेला प्रशासनाने तांत्रिक मुद्दा उपस्थित झाल्याचे सांगत इतर पाच पर्याय सुचवल्याचे सांगितले.
मात्र इचलकरंजी शहरासाठी मंजूर असलेली योजना ही पूर्ण अभ्यास करून तांत्रिक बाबीची पडताळणी करून मंजूर केलेली आहे. २१-२-२०२४ च्या अहवालात प्रशासनाने (scheme)इचलकरंजीच्या बाजूने अहवाल देत गैरसमज व राजकीय मुद्दे स्पष्ट खोडून काढले आहेत.असे असताना केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी आज पर्यंत गेली १३ वर्षे इचलकरंजीरांचा पाणी योजनेसाठी फुटबॉल करण्यात आलेला आहे.आ.राहुल आवाडे यांनी मांडलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन संपण्यापूर्वी याबाबत बैठक लावून निर्णय घेऊ असे आश्वासन दिलेले आहे.या बैठकीस निश्चितच आमदार खासदार दोघेही उपस्थित असतील.
सर्व इचलकरंजीकराना या बाबतीत दोन्ही लोकप्रतिनिधी कडून प्रचंड अपेक्षा आहेत त्यास बांधील राहून दोन्ही लोकप्रतिनिधीनी शासनाकडे ठोस आणि प्रखर भूमिका मांडावी या बैठकीमध्ये कोणत्याही तांत्रिक मुद्याला बळी न पडता योजना अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. असे इचलकरंजीकरांचे मत आहे याबाबत आमदार राहुल आवाडे व खासदार धैर्यशील माने या दोघांची प्रत्यक्ष भेट घेऊन इनामच्या शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली असून दोघांनीही मंजूर योजनेच्या अंमलबजावणीसाठी ठोस भूमिका मांडण्याची विनंती केली आहे. त्यांनीही कोणत्याही परिस्थितीत सुळकुड योजना राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे,तसेच शहरवासियांची पाण्यासाठी होणारी फरफट सोडवण्यासाठी भूमिका ठामपणे शासनापुढे मांडणार असल्याचे आश्वासन ही दिले आहे.
त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून मंजूर झालेली योजना असुन त्यामध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणीस बळी न पडता आमदार खासदार यांनी इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचने केली आहे. यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील,अमित बियाणी,शितल मगदुम,सुषमा साळुंखे,राजुदादा आरगे,विद्यासागर चराटे,राजु कोंन्नुर,अमोल ढवळे,राम आडकी,योगेश पाटुकले,दीपक पंडित,महेंद्र जाधव,जतीन पोतदार,उदय निंबाळकर,अरुण बांगड,अभिजित पटवा उपस्थित होते.
हेही वाचा :
सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट
बेडरुमचा दरवाजा उघडला, समोर पत्नी नको त्या अवस्थेत पाहून …
‘तू हिरोईन वाटतेस तरी का?’ विद्या बालनला पालकांसमोरच दिग्दर्शकाने केलं अपमानीत
कुत्र्याशी तुलना, आज ही अभिनेत्री आहे ३०१० कोटींच्या साम्राज्याची सून
सैफ अली खान आणि करीना कपूरचा संसार मोडणार दीड वर्षात घेणार घटस्फोट