MS Dhoni ने पुन्हा केली कमाल, शाहरुख आणि बिग बींना मागे टाकत बनला ब्रँड एंडोर्समेंटचा ‘बादशाह’

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या फॅन फॉलोइंग किंचितही कमी झालेली नाही. धोनीने भारतातील सेलिब्रिटींच्या ब्रँड एंडोर्समेंट लिस्टमध्ये सर्वोच्च स्थान मिळवलं असून त्याने बॉलिवूडचे दिग्गज स्टार कलाकार अमिताभ बच्चन आणि (king)शाहरुख खान यांना देखील मागे सोडलं आहे. TAM मीडिया रिसर्चनुसार 2024 मध्ये सर्वाधिक ब्रँड एंडोर्समेंट करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या लिस्टमध्ये धोनी पहिल्या क्रमांकावर आहे.

एम एस धोनी हा भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर्सपैकी एक असून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेवटचा सामना हा 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता. त्यानंतर 15 ऑगस्ट 2020 रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र धोनी हा अद्याप आयपीएलमध्ये खेळून चाहत्यांचे मनोरंजन करतो, तसेच नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत देखील राहतो.

रिसर्चच्या एका रिपोर्टनुसार एम एस धोनी 2024 मध्ये सर्वात जास्त ब्रँड एंडोर्समेंट करणारा भारतीय सेलिब्रिटी बनला आहे. धोनीकडे जवळपास 42 एंडोर्समेंट असून या लिस्टमध्ये अमिताभ बच्चन हे दुसऱ्या स्थानावर आहेत. अमिताभ बच्चन यांच्याकडे 41 एंडोर्समेंट आहेत तर (king)शाहरुख खानकडे 34 ब्रँड एंडोर्समेंटच्या डील्स आहेत.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार एम एस धोनीची प्रतिमा चाहत्यांमध्ये फक्त एक क्रिकेटर किंवा खेळ व्यक्तिमत्वपेक्षा जास्त आहे. तो त्याचा शांत स्वभाव, मोठा फॅनबेस आणि कोणत्याही विवादात न पडणे या गुणामुळे जास्त ब्रँड्सना आकर्षित करतो. रिपोर्टनुसार एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी धोनी जवळपास 3.5 ते 6 कोटी रुपये घेतो. 2024 मध्ये धोनी हा Citroën, drone startup Garuda Aerospace, Flipkart-owned Cleartrip, Lay’s by PepsiCo, EMotorad, Mastercard, Gulf Oil, Orient Electric इत्यादी कंपन्यांचा ब्रँड अँबॅसिडर आहे.

42 वर्षांचा एम एस धोनी आयपीएल 2025 मध्ये खेळणार की नाही याबाबत मध्यंतरी मोठी चर्चा होती. मात्र आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी चेन्नई सुपरकिंग्सने धोनीला रिटेन केलंय. महेंद्रसिंह धोनीला आयपीएल 2025 साठी अनकॅप्ड खेळाडू म्हणून 4 कोटींना रिटेन करण्यात आलंय. आयपीएल 2024 पूर्वी एम एस धोनीने चेन्नई सुपरकिंग्सचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवलं होतं. त्यामुळे यंदाही ऋतुराज गायकवाड हाच सीएसकेचं नेतृत्व करेल अशी शक्यता आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! CM फडणवीसांच्या भेटीसाठी गौतम अदानी ‘सागर’वर; चर्चांना उधाण

राज्यात MBBS परीक्षांमध्ये गोंधळ; चारही पेपर फुटले, प्रश्नपत्रिका बदलण्याची नामुष्की

रोहित शर्माचं कर्णधारपद धोक्यात? माजी सलामीवीर फलंदाजाने केले प्रश्न उपस्थित