छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीये. मुकेश चंद्राकरच्या पोस्टमॉर्टम(postmortem) रिपोर्टमध्ये मुकेश चंद्राकरची किती क्रूरपणे हत्या करण्यात आली हे समोर आलंय.

मुकेशच्या पोस्टमॉर्टम(postmortem) रिपोर्टमध्ये डोक्यावर 15 जखमांच्या खुणा आढळल्या. यकृताचे 4 तुकडे सापडले, मान तुटलेली आणि हृदय तुटले यावरून खून किती क्रुर पद्धतीने केला गेला, याचा अंदाज येतो. मुकेशला इतकं मारण्यात आलेलं की त्याच्या बरगड्याही तुटल्या होत्या.
पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन किंवा अधिक लोकांनी मुकेशची हत्या केली आहे. मुकेशच्या शरीरावर एवढा जोरदार वार करण्यात आला की शरीराच्या अनेक अवयवांना जखमा झाल्या. मीडियाशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, मी 12 वर्षात अशी केस कधीच पाहिली नव्हती.
धारदार शस्त्राने पोटावर अनेक वार केले. त्यामुळे लिवरचे चार तुकडे झाले. छातीवरही अनेक वार केले. पोस्टमार्टमच्यावेळी ह्दय फाटलेलं आणि मान तुटलेली आढळून आली.
1 जानेवारीला बेपत्ता झालेल्या मुकेशचा 3 जानेवारीला सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणात आधीच 3 आरोपी रितेश, महेश आणि अन्य एकाला अटक केली आहे.
दरम्यान, आरोपी सुरेश हा पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा चुलत भाऊ आहे. या प्रकरणी सुरेशच्या तीन सख्ख्या भावांसह चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा :
“मुंबईत पुन्हा दहशतीचे षडयंत्र? ताज हॉटेलबाहेर एकाच नंबरच्या दोन गाड्या…
बीड प्रकरणाचे मास्टरमाइंड धनंजय मुंडेच? संभाजीराजेंचा अजित पवारांना थेट सवाल: “त्यांना संरक्षण का?”
नागरिकांना OYOचा मनस्ताप ! OYO बंद करण्यासाठी आमदारांचाही ग्रीन सिग्नल