महाराष्ट्र बंदपूर्वी ‘मविआ’ला मुंबई HC दणका; बंद करणाऱ्यांविरोधात कारवाई करा

मुंबई : बदलापूर् येथील शाळकरी मुलींवरील (mumbai india)अत्याचाराच्या घटनेनंतर मविआकडून उद्या (दि.24) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, या बंदपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मविआला दणका दिला आहे. कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नसल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

वकील गुणरत्न सदावर्तेंसह इतरांनी बंदविरोधात मुंबई(mumbai india)उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याबाबत तातडीची सुनावणी पार पडली. त्यावर कोर्टाने बंदला परवानगी नाकारली आहे. तसेच कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसून जर कोणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

उद्याचा महाराष्ट्र बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. कुठल्या राजकीय नेत्यांच्या किंवा पक्षाच्या विरोधात नाही. तसंच या बंदवेळी अत्यावश्य सेवा कायम ठेवण्यासाठी आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यामध्ये सर्व अत्यावश्यक सुरू राहतील. त्यामुळे कुणी या बंदला राजकीय समजू नये.

उद्या 24 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळला जाणार आहे. या बंदसाठी महाविकास आघाडी मैदानात उतरणार आहे. मात्र, आपल्या मुलींच्या सुरक्षेसाठी सर्व पालकांनी, भावांनी आणि आजोबांनी यामध्ये सहभागी व्हाव असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होते. ते दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा:

मोठी बातमी! भाजपच्या विद्यमान आमदारांचं भविष्य धोक्यात?

बँक खात्यावर पैसे न आल्यास लाडक्या बहिणींनी काय करावे? 

अपक्ष की तुतारीवर लढायचं? समरजीत घाटगेंकडून कार्यकर्त्यांना तीन प्रश्न, उत्तरही मिळालं!