मुंबईने (mumbai)आपल्या आर्थिक ताकद आणि भव्यतेसाठी एक नवीन मानाचा तुरा रोवला आहे. हुरुन इंडिया रिच लिस्ट-2024 नुसार, मुंबईने चीनच्या राजधानी बीजिंगला मागे टाकत आशियात सर्वात जास्त अब्जाधीश असलेल्या शहराचे स्थान मिळवले आहे.
गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत असे दिसून आले आहे की मुंबईतच आशियातील 25 टक्के अब्जाधीश लोक राहतात. बीजिंगपेक्षा मुंबईत अब्जाधीशांची संख्या अधिक आहे, ज्यामुळे मुंबईने आर्थिक राजधानी म्हणून एक महत्वाचा पाऊल उचलले आहे.
हुरुन इंडिया रिच लिस्टने मुंबईला अब्जाधीश लोकांचे आवडते शहर म्हणून मान्यता दिली असून, ही आकडेवारी मुंबईच्या आर्थिक समृद्धीचे आणि जागतिक दर्जाच्या ख्यातनाम शहराच्या स्थितीचे प्रमाण आहे.
हेही वाचा:
‘बिहार पॅटर्न’ला फाटा? संघाच्या सक्रियतेने मुख्यमंत्रीपदावर शिंदेंचा दावा संकटात
17 कोटींच्या 23 किलो सोन्याची तस्करी उघड; DRI ची कारवाई, तिघे आरोपी अटकेत
मविआचा महायुतीला धक्का: राज्यात दर आठवड्यात दोन पक्षप्रवेश…