“महापालिकेचा स्वायत्ततेवर हल्ला; कामे इतर यंत्रणांकडे देण्यामागे काय राजकारण?” – विठ्ठल चोपडे यांची टीका

इचलकरंजी, १२ सप्टेंबर २०२४:
इचलकरंजी महापालिकेसाठी(manchester city) मंजूर झालेल्या रस्ते विकास निधीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे इचलकरंजी शहराध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी महापालिकेच्या स्वायत्ततेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

५१.९५ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (पीडब्ल्यूडी) काम करवून घेण्याच्या निर्णयावर त्यांनी तीव्र टीका केली आहे.

महापालिकेची जबाबदारी अन् बाह्य यंत्रणांचे अंमलबजावण:
चोपडे यांनी विचारले की, महापालिकेकडे स्वतःची तांत्रिक यंत्रणा असताना, आणि ३०% निधी स्वतःच्या बजेटमधून देताना, पीडब्ल्यूडीकडून काम करवून घेण्याचा निर्णय का घेतला जात आहे? यापूर्वीच्या पाण्याच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीवरूनही त्यांनी शंका उपस्थित केली.

महापालिकेच्या स्वायत्ततेचा मुद्दा:
चोपडे यांच्या मते, जर महापालिकेची जबाबदारी इतर शासकीय यंत्रणांवरच सोपवली जात असेल, तर महापालिका बरखास्त करणेच योग्य ठरेल. त्यांनी शासनाच्या निर्णयांवर प्रश्न विचारत, या प्रक्रियेमागे कोणता स्वार्थ आहे का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांमधील संभ्रम:
महापालिकेची स्वायत्तता कमी होत असल्याने नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

हेही वाचा:

राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा; काही ठिकाणी पावसाला विश्रांती

७० वर्षांवरील ज्येष्ठांना मिळणार मोफत आरोग्य विमा; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

खोतवाडी-तारदाळ रस्त्याचे निकृष्ट काम: ग्रामस्थांची नाराजी, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर वचक कोण ठेवणार?