बारामती : बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा(student) खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ३०) सकाळी घडला. महाविद्यालयाच्या आवारातच हा धक्कादायक व गंभीर प्रकार घडल्याने या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
कोयत्याने वार करुन अल्पवयीन विद्यार्थ्याचा(student) खून करण्यात आला आहे. एकाच वर्गात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी हा खून केल्याचे समजते. या घटनेनंतर खून करणाऱ्या दोघांपैकी एकाला महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसरा पसार झाला. पोलीसांनी तातडीने महाविद्यालयाचा परिसर ‘सील’ केला आहे.
या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खून झालेल्या विद्यार्थ्याला उपचारासाठी शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात रक्ताने माखलेल्या अवस्थेत आणण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले आहेत. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तपास सुरु केला आहे. हा विद्यार्थी मूळचा बाहेरील तालुक्यातील असून, तो शिक्षणासाठी बारामती शहरात आल्याचे समजते.
याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक गणेश बिरादर यांनी सांगितले की, एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. दोघा अल्पवयीन विद्यार्थ्यांनी हा खून केला आहे.
हेही वाचा:
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मुलीचा अपघात
५०० च्या नोटेवर गांधींजींचा नाही तर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याचा फोटो
इचलकरंजी पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीची मोठी पावले: कॅबिनेटने तीन सीईटीपी प्लांट्ससाठी ५२९ कोटींची मंजुरी दिली