सांगली: सांगलीतील तासगावातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. तासगाव तालुक्यातील वायफळे गावात पूर्व वैमन्स्यातून झालेल्या हल्ल्यात(attack) एका तरूणाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. वायफळे गावातील बस स्थानक चौक आणि दलित वस्तीत काल सायंकाळी हा हल्ला करण्यात आला.
हल्ल्यातील(attack) जखमींवर भिवघाट येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण उपचारादरम्यान ओंकार उर्फ रोहित संजय फाळके (वय 24) याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर संजय दामू फाळके, जयश्री संजय फाळके, सिकंदर अस्लम शिकलगार, आदित्य गजानन साठे, आशिष गजानन साठे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.या प्रकारानंतर गावात तणावपूर्ण शांतता असून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून वायफळे आणि फाळके कुटुंबियांमध्ये किरकोळ वाद सुरू आहेत. याच वादातून कुटुंबामध्ये काल भांडण झाले. या भांडण थेट मारामारीपर्यंत पोहचले. दोन्ही कुटुंबातील लोकांनी एकमेकांवर यापूर्वीह धारधार शस्त्राने हल्ले केले आहेत. या प्रकरणी यापूर्वी दोन्ही बाजूंकडून पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबामधील वाद चिघळत चालला होता. त्यातच गुरूवारी सायंकाळी या वादात मोठी ठिणगी पडली.
गुरूवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान 10-12 जण दुचाकीवरून वायफळे गावातील बस स्थानक चौकात आले. त्या ठिकाणी ओकांर फाळके उभा होता. या 10-12 जणांनी थेट ओकांवर हल्ला केला. त्याच्यासोबत त्यावेळी त्याच्यासोबत मामाची दोन मुले आदित्य आणि आशिष हे दोघेही होते. या टोळक्याने या दोघांवरही धारधार शस्त्राने हल्ला चढवला.
आदित्य आणि आशिष गंभीर जखमी झाले होते. बस स्थानक चौकात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. पण रोहित घराकडे पळून जाण्यात यशस्वी झाला. बस स्तआनक चौकात बसलेल्या सिकंदर शिकलगावरही या टोळक्याने हल्ला केला. त्यात तोही गंभीर जखमी झाला.
धक्कादायक म्हणजे आदित्य आणि आशिषवर हल्ला केल्यानंतर ते भर चौकातून तलवारी घेऊन दहशत माजवत रोहित फाळकेच्या घरी गेले. त्यांनी थेट घरासमोरच उभ्या असलेल्या रोहित आणि त्याचे आई वडील संजय फाळके, जयश्री फाळके यांच्यावरही हल्ला चढवला. त्यांच्यावर तलवारीने वार करत त्यांना मारहाणही केली. सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर मोटारसायकलवरून ते पसारही झाले.
या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले, पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ घटनास्थळी दाखळ झाले. जखमींना रुग्णालयात दाखल कऱण्यात आले.रात्री उशिरा या प्रकरणाची तक्रार दाखल कऱम्यात आली. पोलिसांनीही हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके ठिकठिकाणी रवाना केली आहेत. पण भर चौकात असा थरार झाल्याने वायफळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात पोलिसांनी पोलीस बंदोबस्त तैनात करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
हेही वाचा :
भाजप अजितदादा-एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का?, आतली बातमी समोर
माझी आई रक्ताच्या थारोळ्यात अन् तो सोन्याच्या बांगड्या काढतोय, लाज नाही वाटली?
पवारसाहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार? काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय सुरु?