मविआत बिघाडी? ‘भावी आमदार’ म्हणून बॅनर लागले; दाव्या प्रतिदाव्यांनी वातावरण तापले

ठाणे: कल्याणमधील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात(environment) शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाचा फायदा घेत काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात (environment)महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचा दावा असणार आहे. त्याचवेळी आता काँग्रेसनेदेखील दावा केल्याने या मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत भावी आमदार अशा आशयाचे बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ महायुतीत कळीचा विषय ठरला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याने जेलमध्ये आहेत. शिवसेना व भाजप यांच्यातील अंतर्गत वादाचा फायदा महाविकास आघाडीला होणार असल्याचे चित्र आहे. कल्याण पूर्व विधानसभेसाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सचिन पोटे यांनी तयारी सुरु केली आहे.

सचिन पोटे यांचा आज वाढदिवस आहे. यानंतर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण पूर्वेत कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा देणारे बॅनर लागले असून या बॅनरवर सचिन पोटेंचा उल्लेख भावी आमदार असा करण्यात आला आहे.

यामुळे काँग्रेसने कल्याण पूर्व मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाकडूनदेखील कल्याण पूर्व मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीवर कारवाई करा अन्यथा उपोषण व आत्मदहनाचा इशारा! Video

15 वर्षे आमदार, 8 वर्षे मंत्री असणाऱ्यांना काळे झेंडे दाखवले का? ‘हद्दवाढ’प्रश्‍नी शौमिका महाडिकांचा आरोप

मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या IPO चर्चा, मालामाल होण्याची नामी संधी