भाजप नेत्या चित्रा वाघ आणि सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही(video). उर्फीच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर रंगलेले ट्विटर वॉर चांगलेच गाजले होते. आता या सर्व प्रकरणावर चित्रा वाघ यांनी पहिल्यांदाच एका मुलाखतीत भाष्य केले असून, आपण उर्फी जावेद विरोधात भूमिका का घेतली, यामागील कारण स्पष्ट केले आहे. एका पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीमुळे आपण हा विषय हातात घेतल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत चित्रा वाघ यांनी सांगितले की, त्यांना एक महिला सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. कामात व्यस्त असल्याने त्यांनी तिला मेसेज करण्यास सांगितले, पण तिचा फोनवरच बोलण्याचा आग्रह होता.
“एकदा रात्री २.३०-३ वाजताच्या सुमारास मी दौऱ्यावरुन आले… त्या बाईचा मला फोन आला आणि मला म्हणाली चित्रा वाघ तुम्ही फक्त हाय प्रोफाईल केस बघणार आहात का? माझं डोकं सटकलं,” असे वाघ म्हणाल्या. त्यांनी त्या महिलेला फोन लावून विचारले असता, तिने व्हॉट्सॲपवर काही व्हिडिओ क्लिप्स पाठवल्याचे सांगितले.
वाघ यांनी सांगितले की, “तिने क्लिप पाठवली होती. त्यामधे एक तरुणी अर्ध्या कपड्यांत रस्त्यावरुन चालली होती. आणि तिच्या मागे मुलं चेकाळून चालली होती.” त्यांना सुरुवातीला ती कोण आहे हे कळले नाही. तेवढ्यात त्यांचा मुलगा तिथे आला आणि त्याने ते व्हिडिओ (video)पाहून, “मम्मा तू हे काय बघतेय? खूप घाण बाई आहे ही…” अशी प्रतिक्रिया दिली आणि ती उर्फी जावेद नावाची मॉडेल असल्याचे सांगितले.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्या व्हिडिओ(video) पाठवणाऱ्या महिलेने पुन्हा फोन केला. तिने सांगितले, “चित्रा ताई तुमच्याकडून आम्हाला शासकीय मदत नकोय… माझ्या ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झालाय. आम्ही त्या ट्रॉमातून अजून बाहेर आलेलो नाही… पण, मला हे सांगायचं की हे तुम्ही थांबवा. उर्फीला सांभाळायला ४ बाऊन्सर आहेत. माझ्या मुलीचा काय दोष होता?”
त्या महिलेने पुढे म्हटले की, उर्फीचे हे सार्वजनिक प्रदर्शन भावना भडकवणारे (“भावना भडकवण्याचं काम सुरूये”) आहे. “तुम्ही याच्यावर काही बोलणार आहात की नाही? हा नंगानाच तुम्ही कधी थांबवणार?” असा सवाल त्या महिलेने केल्याचे चित्रा वाघ यांनी सांगितले. “त्यानंतर मग मी उर्फी जावेदचा विषय हातात घेतला,” असे वाघ यांनी स्पष्ट केले.
या भूमिकेनंतर नेहमीप्रमाणे आपल्यावरच टीकेची झोड उठल्याचेही त्यांनी सांगितले. “काही महिल्याच म्हणाल्या की कोणी काय घालायचं याचा संविधानाने दाखला दिलाय,” असे सांगत त्यांनी आपल्यावरील टीका आणि घटनाक्रम सांगितला. मात्र, एका पीडित मुलीच्या आईच्या व्यथेतून आणि तिच्या आवाहनानंतर आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सूचित केले. त्यांनी उर्फीविरोधात महिला आयोगाकडे तक्रारही दाखल केली होती.
हेही वाचा :
“कराड” प्रवृत्ती कडून “व्यवस्थे” चीही हत्या!
चहावाल्याचा धक्कादायक निर्णय! सुसाईड नोट थेट आमदाराच्या कार्यालयात
यशस्वी जयस्वाल मुंबई सोडणार?, सर्वात मोठी अपडेट समोर