आलियाचा प्रश्न आणि मोदींचे उत्तर: आफ्रिकेच्या व्हिडीओतील गाण्याची गोष्ट

राज कपूर 100 फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने कपूर कुटुंबाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. दिल्लीत झालेल्या या भेटीत रणबीर कपूर(Entertainment news) , आलिया भट्ट करिना कपूर, सैफ अली खान, करिश्मा कपूर, नितू कपूर ,आणि रिधिमा कपूर साहनी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एक्स अकाऊटंवरुन शेअर केलेल्या व्हिडीओत कपूर कुटुंब आपला अनुभव शेअर करताना दिसत आहे.

यादरम्यान नरेंद्र मोदी आणि कपूर(Entertainment news) कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी आलिया भट्टने नरेंद्र मोदींना तुम्ही गाणी ऐकता का? असा प्रश्न विचारला. तुम्हाला गाणी ऐकण्यास वेळ मिळतो का? असा प्रश्न आलिया भट्टने विचारला. त्यावर नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं की, “मला संगीत आवडत असल्याने मला ऐकायला मिळतं. कधी संधी मिळाली तर मी नक्की ऐकतो”.

आलिया भट्टने यावेळी नरेंद्र मोदींना त्यांच्या आफ्रिकेतील एका व्हिडीओबद्दल सांगितलं. नरेंद्र मोदी आफ्रिका दौऱ्यावर असताना एका सैनिकाने त्यांच्यासमोर आलिया भट्टच्या चित्रपटातील गाणं बोलून दाखवलं होतं. “अलीकडे, मला वाटतं की तुम्ही आफ्रिकेत गेला होतात. मी एक क्लिप पाहिली जिथे काही सैनिक माझं गाणं गात होते. बऱ्याच लोकांनी मला ती क्लिप पाठवली. आम्हा सर्वांना ते पाहून खूप आनंद झाला”.

दरम्यान, हा महोत्सव भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक राज कपूर यांची जन्मशताब्दी साजरी करेल. 1988 मध्ये राज कपूर यांचं निधन झालं. यामध्ये 100 रुपयांच्या तिकीट किमतीसह 40 शहरं आणि 135 सिनेमागृहांमध्ये राज कपूर यांचे 10 प्रसिद्ध चित्रपट प्रदर्शित केले जातात. फिल्म फेस्टिव्हलची घोषणा करण्यात आली असून त्यात आग, बरसात, आवारा, श्री 420 आणि मेरा नाम जोकर या चित्रपटांचा समावेश आहे. यामुळे चित्रपटप्रेमींमध्ये उत्सुकता आणि कुतुहूल निर्माण केलं आहे.

हेही वाचा :

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच राहु आणि बुधाची युती; 3 राशींचे ‘अच्छे दिन’

शेतकऱ्यांनी कांद्याच्या दरामुळे केंद्राकडे केली मोठी मागणी!

मोठा संवाद! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकी चर्चा कशावर?