विरारमधील नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये घडलेल्या विचित्र दुर्घटने मध्ये ठाणे जिल्ह्याचे(death) शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाचं निधन झाल्याचे समजते. पार्किंगवरुन झालेल्या वादानंतर रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे यांना हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही संपू्र्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार नवापूर येथील रिसॉर्टमध्ये मिलिंद मोरे(death) यांचे निधन झालं आहे. ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचं अचानक निधन झालं आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून त्याबद्दलचं गूढ कायम असलं तरी त्यांना जमावाने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील ‘सेवेन सी रिसॉट’मध्ये हा प्रकार घडला.
रविवार असल्याने ठाण्यावरून मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह सह 8 ते 10 जणांसोबत ‘सेवेन सी रिसॉट’मध्ये आले होते. गाडी गेटमधून मागे पुढे करताना एक रिक्षाचा धक्का लागल्याने मोरे आणि या रिक्षावाल्यामध्ये भांडणं झालं. यावेळी रिक्षाचालकाने स्थानिकांच्या मदतीने मिलिंद आणि इतर दोघांना मारहाण केली. वाद निवळण्यासाठी स्थानिकांबरोबर बातचीत सुरु असताना मिलिंद अचानक चक्कर आल्याने कोसळले.
कारच्या बोनेटला टेकून उभे असताना अचानक मोरे यांनी मान टाकली आणि ते खाली कोसळले. मोरेंना कोसळ्याचं पाहून तिथे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. मोरे यांना तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं. मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आलं.
मिलिंद कोसळल्याची घटना रिसॅार्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अर्नाळा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. मिलिंद हे 45 वर्षांचे होते. आनंद दिघेंनंतर ठाण्याचे जिल्हा प्रमुख राहिलेल्या रघुनाथ मोरे यांचे ते पुत्र होते. या घटनेमुळे मिलिंद यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सदर प्रकरणामध्ये स्थानिक रिक्षा चालकाबरोबरच मिलिंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.
हेही वाचा :
‘गुलाबी साडी’ गाण्यामागची कहाणी: संजू राठोडने सांगितली यशाची कथा
मनू भाकरच्या यशस्वी वाटचालीमागे गीतेचे धडे, गुरूंचा मार्गदर्शन, आणि तिची जिद्द
कोल्हापुरातील चक्क पोलीस मुख्यालयातून पोलिसांची दुचाकी लंपास
लाडकी बहीण योजना राबवा पण लाडक्या पूरग्रस्तांना विसरू नका : सतेज पाटील