दाक्षिणाच्य अभिनेत्री शोभिता धुलिपाला आणि नागा चैतन्य हे अखेर लग्न बंधनात अडकले आहेत. लग्नानंतर त्या दोघांनी सोशल मीडियावर एकही (photos)फोटो शेअर केला नव्हता. लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांनी शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यांच्या फोटोवर नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहेत.
शोभितानं तिच्या इन्स्टाग्रामवर अकांऊटवरून हे(photos) फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो यावेळी पाहायला मिळत आहेत. पहिल्या फोटोमध्ये शोभिता आणि नागा चैतन्य हे समोरा समोर उभे आहेत आणि शोभितानं नागा चैतन्यचा चेहरा पकडला आहे. दुसऱ्या फोटोत लग्नातील विधी दिसत आहेत. तिसऱ्या फोटोमध्ये नागा चैतन्यनं शोभिताला मंगळसुत्र घातल्याचं दिसत आहे. चौथ्या फोटोमध्ये वरमाळा घालतानाची विधी पाहायला मिळत आहे. त्यानंतर शोभितानं नवरा नागा चैतन्यचा फोटो शेअर केला आहे. तर सहाव्या फोटोमध्ये लग्नाच्या विधीत आनंदी शोभिता दिसत आहे. पुढच्या फोटोत शोभिताच्या पायात जोडवे पाहायला मिळत आहेत. तर लग्न समारंभात पुढच्या विधीची शोभिता कशी प्रतीक्षा करते ते पाहायला मिळत आहे. पुढे शोभिताला नागा चैतन्य शुक्र तारा दाखवत असल्याचा एक फोटो आहे. हे सगळे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
या लग्न सोहळ्यात परंपरेचं पालन करत शोभितानं पारंपरीक कांजीवरम रेशमी साडी नेसली. त्यावर तिनं टेम्पल ज्वेलरी घातली आणि स्वत: चा लूक पूर्ण केला. तर नागा चैतन्यनं पांढऱ्या रंगाचे पारंपारिक कपडे परिधान केले होते. हे फोटो शेअर करत शोभितानं कॅप्शन देत तेलगूमध्ये लिहिलं की ‘हा एक पवित्र धागा आहे. हा धागा माझ्या सुंदर आयुष्यासाठी गरजेचा आहे. मी हा धागा तुझ्या गळ्यात बांधतो, तू खूप गुणं असलेली महिला आहेस, तू 100 वर्ष आनंदी रहा.’
दरम्यान, अनेक नेटकऱ्यांना समांथाची आठवण आली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘4 वर्षांपूर्वी त्यानं त्यांच्या आणि समांथांच्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. इतक्या आठवणी कोणी अशा एका वर्षात विसरु शकतो.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘त्याची ओळख आता कायम हीच राहणार की तो समांथाचा पूर्वाश्रमीचा नवरा आहे आणि शोभिता कायम त्याची दुसरी पत्नी राहिल. हे सत्य आहे.’ अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी त्या दोघांना ट्रोल केलं आहे.
हेही वाचा :
“लाडक्या बहिणींना नोटीस पाठवून पैसे परत…”, संजय राऊतांनी केला धक्कादायक खुलासा
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम
आज रवि योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग;’या’ 5 राशींचं भाग्य उजळणार