लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले नागा चैतन्य आणि शोभिता, Video Viral

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा (marriage)विवाहसोहळा ४ डिसेंबर रोजी हैदराबाद इथं थाटामाटात पार पडला. अन्नपूर्णा स्टुडिओत कुटुंबिय आणि जवळचे मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता ही जोडी लग्नानंतर देवदर्शनाला गेल्याचं पाहायला मिळालं.

लग्नानंतर(marriage) नागा चैतन्य आणि शोभिता हे पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाले आहेत. ही जोडी आंध्र प्रदेशातल्या भ्रामरांबिका समिता मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम, ज्याला श्रीशैलम मंदिर नावानंही ओळखल जातं, तिथं दर्शनाला आली होती. या दोघांसोबत नागा चैतन्यचे वडील अभिनेते नागार्जुन अक्किनेनी देखील आल होते. यावेळी त्यांना पापाराझीनं स्पॉट केलं. देशदर्शनाला आलेल्या या जोडीचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या व्हायरल व्हिडिओत नागा चैतन्य पारंपरिक कपड्यांमध्ये दिसतोय. त्यानं धोतर आणि कुर्ता घातला आहे. तर नव वधून शोभिता हिनं पिवळ्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे. दोघेही या खास लुकमध्ये उठून दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगून जात आहे. पापाराझीला पाहून दोघेहे हसल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता यांनी अद्याप लग्नाचे फोटो शेअर केले नाहीयेत.पण नागार्जुन यांनी या दोघांचे फोटो शेअर करत सून शोभिताचं अक्किनेनी कुटुंबात स्वागत केलं आहे.

नागा चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे. त्याचं पहिलं लग्न हे अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु हिच्यासोबत झालं होतं. २०१७मध्ये दोघे लग्नबंधनात अडकले होते, मात्र काही वर्षांतच त्यांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यांच्या घटस्फोटानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

२५ वर्षांनी ‘आभाळमाया’ मालिकेतील कलाकार पुन्हा एकत्र, आठवणींनी डोळ्यांत पाणी काही महिन्यांपूर्वीच शोभिता आणि नागा चैतन्य यांची ओळख झाली, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला

हेही वाचा :

अभ्यास सोडून तरुणीच्या डोक्यातील काढतोय उवा; Viral Video

गृहमंत्रिद कुणाला मिळणार, पहिल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य!

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटानं मोडले ‘जवान’ आणि ‘अ‍ॅनिमल’चे रेकॉर्ड