औरंग्यावरूनची नागपूर दंगल काश्मीर “मोडस” वापरली….?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एखाद्या गंभीर प्रश्नावरून पूर्वी उत्स्फूर्तपणे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण व्हायची. पोलिसांकडून झालेल्या क्रियेला जमलेल्या जमावाकडून प्रतिक्रिया दिली जायची. अनेकदा अशा प्रकारची प्रतिक्रिया ही अनिष्ट किंवा हिंसक असायची. आता दंगलीची(Riot) परिभाषा बदललेली आहे. दंगल घडविण्याचे पद्धतशीर नियोजन केले जाते, दंगलीमध्ये आघाडीवर असलेले तरुण आता शेजारच्या जिल्ह्यातून किंवा ग्रामीण भागातून आयात केले जातात. आता तर दंगलीची मोडस ऑप्रेंडी सुद्धा (गुन्हे पद्धत) आयात केली जात आहे. नागपूर येथे औरंग्याच्या स्टेटस वरून उसळलेल्या दंगली मागे हेच सूत्र आहे असे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

नागपूर येथील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी जारी केल्यानंतर पोलिसांच्या तपासाला गती आली. या तपासात काही गोष्टी आढळल्या, त्या खटकणाऱ्या होत्या. उदाहरणच द्यायचे झाले तर ज्या महाल भागात ही दंगल(Riot) उसळली तेव्हा दररोज दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे पार्किंग व्हायचे त्या ठिकाणी सायंकाळी एकही वाहन उभा करून ठेवण्यात आलेले नव्हते. याचा अर्थ वाहन चालकांना या भागात दंगल उसळणार आहे याची पूर्वकल्पना होती असा होतो.

विधिमंडळात झालेल्या चर्चेत मंत्री नितेश राणे यांनी हाच मुद्दा मांडला. याशिवाय दंगल ग्रस्त भागातून रस्त्यावर विखरून पडलेले एक ट्रॉली भरून दगड पोलिसांनी गोळा केले. इतक्या मोठ्या प्रमाणावर हे दगड महालभागातच कसे काय मिळून आले? असा तपास करणाऱ्या पोलिसांना प्रश्न पडला होता. अशाच प्रकारची दगडफेक काश्मीरमध्ये जवानांच्या वर केली जाते. हे अनेकदा स्पष्ट झाले होते. मग पोलिसांना रस्त्यावरील दगड गोळा करून बाहेर फेकून द्यावे लागले होते.

दगडफेक करण्यासाठी आधीच हाताने सहज फेकता येतील असे मध्यम आकाराचे दगड दंगलखोरांच्याकडून गोळा केले जातात, आणि मग त्याचा पोलिसांवर वापर केला जातो. दंगलखोर जमावाची दगडफेक करण्याची ही गुन्हे पद्धत काश्मीरची आहे. आणि हीच पद्धत नागपूर मध्ये वापरली गेली आहे असे तपासी अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कदाचित आता नागपूर दंगलीचा तपास हा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूरची दंगल(Riot) ही पूर्वनियोजित होती. मुस्लिम समाजातील काही असामाजिक घटकांनी दंगल करण्याचा कट रचला होता. सय्यद अली आणि फईम हे या दंगलीमागचे मास्टरमाइंड असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राज्याचे गृह खाते असल्यामुळे त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या नागपूर मधील दंगली मागचे असामाजिक घटक कोणत्या समाजाचे आहेत हे समजले होते. कारण विधिमंडळात या संदर्भात त्यांनी केलेले भाषण त्यांना दंगलीची पूर्ण माहिती असल्यासारखे होते. पोलिसांवर केलेला हल्ला हे सरकार कोणत्याही स्थितीत खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यानंतर अगदी 24 तासात त्या दंगलीमाचे मास्टरमाईंड पोलिसांकडून पकडले जातात.

या दंगलीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे एका विशिष्ट समाजाचा रस्त्यावर उतरलेला जमाव हा महाल भागातील किंवा त्याच्या आसपासच्या परिसरातील नव्हता, तर तो शेजारच्या जिल्ह्यातून किंवा नागपूरच्या ग्रामीण भागातून आलेला होता हे पोलिसांचे तपासातील प्राथमिक निरीक्षण महत्त्वाचे आहे. याचा अर्थ दंगल करणाऱ्या तरुणांना सोमवारी दुपारी महाल भागात बाहेरून आयात करण्यात आलेले होते हे प्रथमदर्शनी स्पष्ट होते.

नागपूर मध्ये ज्या भागात दंगल(Riot) उसळली, त्या भागात अगदी सहजासहजी दगड सापडत नाहीत. मग ट्रॉली भरून दगड आले कुठून? महाल भागातील मार्केट परिसरात सोमवारी सायंकाळी एकही वाहन नव्हते. एरवी या परिसरात दुचाकी आणि चार चाकी वाहने पार्क करून ठेवलेली असतात. पोलिसांनी दंगल झालेल्या भागातील सीसीटीव्ही मधील फुटेज तपासले तेव्हा दंगल खोरामध्ये एखादा दुसराच स्थानिक दिसत होता. पोलिसांनी दंगल प्रकरणी अटक केलेल्या मध्ये विशिष्ट समाजाचे कंटक दिसून आलेले आहेत.

नागपूर येथे उसळलेल्या दंगलीला एकाच विशिष्ट समाजातील असामाजिक घटक जबाबदार आहेत, पण औरंग्याच्या बद्दल मनात विलक्षण चीड आणि संताप असलेले लोकही या दंगलीत नव्हते असे म्हणता येत नाही. पण सुरू आता त्यांच्याकडून झालेली नाही असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आढळून आलेले आहे. आता या दंगली मागची कारणे पोलीस शोधून काढतीलच शिवाय राष्ट्रीय तपास यंत्रणा सुद्धा तपासामध्ये उतरेल अशी शक्यता आहे.

हेही वाचा :

पावसाचा खेळ सुरूच! पश्चिम महाराष्ट्रात तापला, विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

दिवसभर फोन वापरताय तुमचा मेंदू मंदावतोय नुकसान जाणून तुम्हालाही बसेल धक्का

हा देश ठरणार तिसर्‍या महायुद्धाचे कारण! बाबा वेंगाची काय भविष्यवाणी